Samsung स्मार्टफोनच्या जगात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनी सध्या नवीन सीरीज Galaxy S23 वर काम करत आहे. कॅमेरा स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत, ही नवीन सिरीज खूप खास असणार आहे. Tipster IceUniverse नुसार, कंपनी Samsung Galaxy S23 Ultra मध्ये 200-megapixel कॅमेरा सेन्सर ऑफर करणार आहे.
हा सॅमसंग फोन Motorola Frontier आणि Xiaomi 12T Pro सोबत 200MP कॅमेरा सह स्पर्धा करेल, असे वृत्त आहे. हा Moto फोन Samsung Galaxy S23 Ultra आणि Xiaomi 12T Pro च्या आधी बाजारात लाँच केला जाऊ शकतो. मात्र, या उपकरणांच्या लाँच तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हे सुद्धा वाचा : Nothing Phone 1: आज होणार फोनची पहिली विक्री, खरेदी करण्यापूर्वी 'या' समस्या देखील जाणून घ्या
टिपस्टरच्या मते, सॅमसंगने Galaxy S23 Ultra वर कोणता 200MP कॅमेरा सेन्सर ऑफर केला जाईल, हे अद्याप उघड केले नाही. कंपनी यात मोटोरोला फ्रंटियरचा कॅमेरा सेन्सर देऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. Motorola Frontier मध्ये बसवलेला 200MP कॅमेरा सेन्सर सॅमसंगनेच तयार केला आहे. या सेन्सरचे नाव 200MP Samsung ISOCELL HP1 आहे. रिपोर्ट्सनुसार, Xiaomi देखील आपल्या नवीन फोन Xiaomi 12T Pro मध्ये 200MP कॅमेरा देऊ शकते.
सॅमसंगने अलीकडे 200MP ISOCELL HP3 सेन्सर देखील सादर केला आहे. यामध्ये मिळणाऱ्या कॅमेरा मॉड्यूलचे एरिया HP1 सेन्सरच्या तुलनेत सुमारे 20 टक्के कमी आहे. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, कंपनी नोव्हेंबरमध्ये लाँच होणाऱ्या Galaxy S23 सीरीजमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देऊ शकते.
Samsung Galaxy S23 सीरीजच्या फ्रंट कॅमेर्याबद्दलही बरीच चर्चा सुरू आहे. असे मानले जाते की, कंपनी आपल्या स्मार्टफोन्सच्या सिरीजमध्ये 40-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy S23 सीरीजच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल युजर्समध्ये बराच उत्साह आहे. नवीन S23 सिरीजचा कॅमेरा देखील Galaxy S22 Ultra सारखा उत्कृष्ट असेल अशी अपेक्षा केली जात आहे.