Samsung Galaxy Z Fold5, Galaxy Z Flip5 Offers: लोकप्रिय फोल्डेबल फोन्सची सेल, मिळेल हजारो रुपयांची सूट

Updated on 18-Aug-2023
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Z Fold5 आणि Galaxy Z Flip5 ची सेल आजपासून भारतात सुरू

पहिल्या सेल अंतर्गत, लोकांना हजारो रुपयांच्या सवलतीत फोन खरेदी करण्याची संधी मिळतेय.

HDFC बँक क्रेडिट कार्डवर 8000 रुपयांची सूट

Samsung Galaxy Z Fold5 आणि Galaxy Z Flip5 स्मार्टफोन्स अलीकडेच लाँच करण्यात आले होते. त्यानंतर, आता Samsung Galaxy Z Fold5 आणि Galaxy Z Flip5 ची सेल आजपासून भारतात सुरू झाली आहे. कंपनीने जुलैमध्ये 2023 च्या अनपॅक्ड इव्हेंटमध्ये दोन्ही फोल्डेबल फोन लाँच केले. लाँचनंतर दोन्ही फोन्स प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होते. आज म्हणजेच 18 ऑगस्ट 2023 पासून त्यांची खुली विक्री अखेर सुरू झाली आहे. पहिल्या सेल अंतर्गत, लोकांना हजारो रुपयांच्या सवलतीत फोन खरेदी करण्याची संधी मिळतेय. त्यामुळे त्वरा करा आणि नवीन फोल्डेबल फोन्स खरेदी करा. 

Samsung Galaxy Z Fold5 आणि Galaxy Z Flip5 सेल सुरु

हे दोन्ही फोल्डेबल फोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट तसेच ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि Flipkart वरून अनेक ऑफर्ससह खरेदीसाठी उपलब्ध आहेत. 

Samsung Galazy Z Fold5 च्या 12GB रॅमसह 256GB स्टोरेज बेस व्हेरिएंटची किंमत 1,54,999 रुपये आहे. तर, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 1,64,999 रुपये आहे. त्याबरोबरच, 12GB रॅम आणि 1TB स्टोरेजसह टॉप व्हेरिएंट 1,84,999 मध्ये लाँच करण्यात आला आहे.

Samsung Galaxy Z Flip5 ची 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 99,999 रुपये आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,09,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon आणि Flipkart वरून खरेदी करताना HDFC बँक क्रेडिट कार्डवर 8000 रुपयांची सूट मिळत आहे. तर, अधिकृत वेबसाइटवर 5000 रुपये प्रमोशनल डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galazy Z Fold5 चे महत्त्वाचे तपशील

Galaxy Z Fold5 मध्ये 7.6-इंच लांबीचा QXGA+ डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये 6.2-इंच लांबीचा HD+ डायनॅमिक AMOLED 2X कव्हर डिस्प्ले आहे. यात Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे. स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 हा सध्या व्यवसायातील सर्वोत्तम चिपसेट असण्याची शक्यता आहे.तसेच, फोनला पॉवर देण्यासाठी 4400mAh बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP अल्ट्रा वाईड कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 10MP टेलिफोटो कॅमेरा आहे.

येथे अधिक वाचा: Samsung Galaxy Z Flip5, Galaxy Z Fold5 Pre-booking: Amazon वर 20,000 रुपयांची बचत करा, कसे? ते पहा

Samsung Galaxy Z flip5 चे महत्त्वाचे तपशील

Samsung Galaxy Z flip5 मध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ AMOLED मुख्य डिस्प्ले आणि 3.4-इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले आहे. हे 3700mAh बॅटरीसह सुसज्ज आहे आणि Android 13 वर चालते. या फोनमध्ये 10MP सेल्फी कॅमेरा आणि 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात शक्तिशाली GPU, मजबूत संगणकीय क्षमता आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :