Samsung Galaxy Z Fold 6 5G आणि Galaxy Z Flip 6 5G ची विक्री सुरू, बंपर Discount उपलब्ध 

Samsung Galaxy Z Fold 6 5G आणि Galaxy Z Flip 6 5G ची विक्री सुरू, बंपर Discount उपलब्ध 
HIGHLIGHTS

Samsung ने अलिडकेच Samsung Galaxy Z Fold 6 5G आणि Galaxy Z Flip 6 5G भारतात लाँच केले.

Samsung च्या नव्या फोल्डेबल फोन्सची पहिली सेल आजपासून सुरु

पहिल्या सेलदरम्यान दोन्ही स्मार्टफोन्सवर मोठ्या ऑफर्स उपलब्ध आहेत.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला Samsung ने Samsung Galaxy Z Fold 6 5G आणि Galaxy Z Flip 6 5G भारतीय बाजारात लाँच केले. तसेच, 10 जुलै 2024 रोजी आयोजित Samsung गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Watch 7 आणि Galaxy Watch Ultra सारखी कंपनीची अनेक प्रोडक्ट्स लाँच करण्यात आली. त्यानंतर नव्या फोल्डेबल स्मार्टफोन्सची विक्री आजपासून भारतात सुरु झाली आहे. स्मार्टफोन्ससोबत इतर उपकरणांची विक्रीदेखील सुरु करण्यात आली आहे.

तुमच्या माहितीसाठी, दोन्ही फोल्डेबल फोनच्या प्री-ऑर्डर लाँच होण्यापूर्वीच सुरू झाली होती. तर, Samsung Galaxy Z Fold 6 5G आणि Galaxy Z Flip 6 5G ची खुली विक्री आजपासून सुरू होत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात पहिल्या सेलमधील ऑफर्स-

Also Read: Price Cut! लेटेस्ट Realme 12 Pro 5G च्या किमतीत 4,500 रुपयांची कपात, जाणून घ्या नवी किंमत

Samsung Galaxy Z Fold 6

Samsung Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 5G वरील ऑफर्स

हे दोन्ही स्मार्टफोन Samsung.com आणि ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. Amazon वरून खरेदी केल्यावर दोन्ही फोनवर 8000-8000 रुपयांची सवलत उपलब्ध आहे. लक्षात घ्या की, ही ऑफर फक्त HDFC बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यावर उपलब्ध असेल.

Samsung Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 5G ची किंमत

Samsung Galaxy Z Fold 6 ची किंमत 1,64,999 रुपयांपासून सुरू होते. या किमतीत फोनचा 1TB पर्यंत स्टोरेज आणि 12GB रॅम उपलब्ध आहे. तर, दुसरीकडे Samsung Galaxy Z Flip 6 दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 1,09,999 रुपये आहे.

Samsung Galaxy Z Flip 6 AI
Samsung Galaxy Z Flip 6 AI

Samsung Galaxy Z Fold 6

Samsung Galaxy Z Fold 6 स्मार्टफोनमध्ये 7.6 इंच लांबीचा QXGA+ डायनॅमिक AMOLED 2X मुख्य डिस्प्ले आहे. याव्यतिरिक्त, हँडसेट 6.3-इंच लांबीचा HD+ डायनॅमिक AMOLED 2X सेकंडरी डिस्प्ले मिळेल. या दोन्ही डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, कंपनीने या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला आहे. हा फोन S पेन सपोर्टसह येतो.

फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेरासह येतो. ज्यामध्ये यात 2X ऑप्टिकल झूम, 12MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 10MP टेलिफोटो लेन्ससह 50MP मुख्य कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनच्या समोर 10MP कॅमेरा देण्यात आला आहे. दुसऱ्या डिस्प्लेवर 4MP कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी, डिव्हाइसमध्ये 4,400mAh बॅटरी आहे.

Samsung Galaxy Z Flip 6

लेटेस्ट फ्लिप फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X मुख्य डिस्प्ले प्रदान देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3.4 इंच लांबीचा सुपर AMOLED कव्हर डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येतो. या फोनमध्ये Galaxy AI चे फीचर्स देण्यात आले आहेत. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. जो 2X झूमसह 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरासह सज्ज आहे. तर, यात 10MP फ्रंट कॅमेरा देखील मिळेल. पॉवरसाठी या फोनमध्ये 4000mAh बॅटरी उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo