लिमिटेड टाइम ऑफर! Samsungच्या लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर्सची घोषणा, तब्बल 16,000 रुपयांची सूट

Updated on 31-Aug-2023
HIGHLIGHTS

ऑफरसह तुम्ही Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5 स्वस्तात खरेदी करू शकता.

मात्र, तुम्हाला घाई करावी लागेल, कारण ही ऑफर मर्यादित काळासाठी वैध असेल.

सॅमसंगने अलीकडेच त्यांचे नवीन फोल्डिंग फोन Samsung Galaxy Z Fold 5 आणि Flip 5 लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या स्मार्टफोन्सबाबत कंपनीने नवीन ऑफर जाहीर केल्या आहेत. या ऑफरसह तुम्ही Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5 स्वस्तात खरेदी करू शकता.मात्र, तुम्हाला घाई करावी लागेल, कारण ही ऑफर मर्यादित काळासाठी वैध असेल. 

Samsung Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5 ची किंमत

Galaxy Z Fold 5 च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,54,999 रुपये आहे. तर त्याचा 512GB स्टोरेज व्हेरिएंट 1,64,999 रुपयांना येतो, तर 1TB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 1,84,999 रुपयांमध्ये येतो. Samsung Galaxy Z Fold 5 स्मार्टफोन आइस ब्लू, क्रीम आणि फँटम ब्लॅक रंगांमध्ये येतो.

तर, Galaxy Z Flip 5 च्या 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 99,999 रुपये आहे. तर त्याचा 512GB स्टोरेज व्हेरिएंट 1,09,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही मिंट, क्रीम, ग्रेफाइट आणि लॅव्हेंडर रंगांमध्ये Galaxy Z Flip 5 खरेदी करू शकता.

दोन्ही उपकरणे Samsung.com, Amazon, Flipkart आणि भारतातील इतर अधिकृत रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येतील.

Samsung Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5 वरील ऑफर्स

सॅमसंगच्या फोल्डिंग फोनवर उपलब्ध ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, Galaxy Z Fold 5 वर 7,000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. याशिवाय, कंपनी 9000 रुपयांचे अपग्रेड बोनस देत आहे. म्हणजेच युजर्सना एकूण 16 हजार रुपयांची ऑफर मिळत आहे. याशिवाय ग्राहकांना 9 महिन्यांच्या शून्य व्याज EMI चा पर्याय मिळत आहे.

नवीन ऑफर अंतर्गत, तुम्ही Galaxy Z Flip 5 चा 256GB स्टोरेज व्हेरिएंट 85,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर ऑफर्ससह तुम्ही Fold 5 चा 256GB स्टोरेज व्हेरिएंट 1,38,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

तुम्ही Fold 5 खरेदी करण्याचा आणि तुमचा सध्याचा फोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला 11000 रुपयांपर्यंतचा बोनस मिळू शकतो. हा बोनस नॉन-ईएमआय पर्यायावर आहे. या सर्व ऑफर Galaxy Z Flip 5 च्या 512GB स्टोरेज प्रकार आणि Fold 5 च्या 512GB आणि 1TB स्टोरेज प्रकारांवर उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :