Samsung Galaxy Z Fold5 आणि Galaxy Z Flip5 चे प्री-बुकिंग भारतात सुरू झाले आहे. नुकतेच लाँच झालेल्या या सॅमसंग फोल्डेबल फोनच्या खरेदीवर ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर मर्यादित काळासाठी डील दिली जात आहे. चला तर जाणून घेऊया या दोन्ही फोनचे फीचर्स आणि ऑफर्स…
Galaxy Z Fold5 च्या 12GB RAM + 512GB व्हेरिएंटची किंमत 1,64,999 रुपये आहे. तर फोनच्या टॉप वेरिएंटची किंमत 1,84,999 रुपये आहे. हा फोन HDFC बँकेच्या कार्डने Amazon वरून खरेदी केल्यास 8,000 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय एक्सचेंजवर 5,000 रुपयांचा बोनस देखील मिळणार आहे.
सॅमसंगच्या या नवीनतम फोल्डेबल फोनमध्ये 7.6-इंच लांबीचा मुख्य फोल्डेबल डिस्प्ले आहे. याशिवाय या फोनमध्ये 6.2-इंच लांबीची कव्हर स्क्रीन उपलब्ध असेल. या फोनच्या मुख्य आणि कव्हर डिस्प्लेमध्ये 2X डायनॅमिक AMOLED पॅनेलचा वापर करण्यात आला आहे. हे दोन्ही डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. Galaxy Z Fold5 च्या डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 देण्यात आला आहे.
Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर फोनमध्ये उपलब्ध आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर त्यांच्या कमीपावर वापरासाठी आणि जलद कामगिरीसाठी ओळखले जातात. ज्यासोबत 12GB रॅम आणि 512GB/1TB अंतर्गत स्टोरेज सपोर्टसह उपलब्ध आहे.
या फोनमध्ये 4,400mAh ची बॅटरी उपलब्ध आहे. तसेच, हे 45W USB टाइप C वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग वैशिष्ट्यांना समर्थन देते. यासह तुम्हाला दीर्घकाळ बॅटरी लाईफ मिळणार आहे. फोन IPX8 वॉटर आणि डस्ट प्रूफ आहे आणि Android 13 वर आधारित OneUI 5.2 वर काम करतो.
या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात OISसह 50MP मुख्य कॅमेरा आहे. स्मार्टफोनवरील 50 MP कॅमेरा उच्च रिझोल्यूशन आणि डीटेल्ड इमेज देऊ शकतो. याशिवाय फोनमध्ये 12MP अल्ट्रा वाइड आणि 10MP टेलिफोटो कॅमेरा उपलब्ध असेल. सेल्फीसाठी, मुख्य स्क्रीनवर 4MP अंडर-डिस्प्ले कॅमेरा मिळेल. त्याच वेळी, कव्हर स्क्रीनसह 10MP कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.
Galaxy Z Flip5 नवा फोन 8GB RAM + 256GB आणि 8GB RAM + 512GB व्हेरिएंटसह येतो. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 99,999 रुपये आहे, तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 1,09,999 रुपये आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास HDFC बँकेच्या कार्डने फोन विकत घेतल्यावर 8,000 रुपये कॅशबॅक आणि 12,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे.
सॅमसंगच्या नुकतेच लाँच झालेल्या फ्लिप स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा मुख्य फोल्डेबल डिस्प्ले आहे. फोनच्या मुख्य डिस्प्लेमध्ये FHD + AMOLED स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. यात एक मोठा 3.4-इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले मिळेल, जो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. AMOLED डिस्प्ले कमी उर्जा वापरतो, अधिक क्लियर पिक्चर कॉलिटी देतो.
या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देखील उपलब्ध असेल, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 256GB/512GB अंतर्गत स्टोरेज सपोर्ट असेल. वर सांगितल्याप्रमाणे, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर त्यांच्या कमीपावर वापरासाठी आणि जलद कामगिरीसाठी ओळखले जातात. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यासह, 10MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे, तर मागे ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. यात 12MP चे दोन कॅमेरे आहेत.
फोनमध्ये 3,700mAh बॅटरी उपलब्ध आहे. या बॅटरीसह दिवसातून 2-3 तास ऑनलाइन आणि क्वचित गेम खेळायचे आहे त्यांच्यासाठी हे उपकरण योग्य राहील. Galaxy Z Flip5 मध्ये चार्जिंगसाठी USB Type C वायर्ड फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग फीचर उपलब्ध आहे. हा फोन Android 13 वर आधारित OneUI 5.2 वर काम करतो.