नव्या Attractive अवतारात भारतात येतोय Samsung Galaxy Z Flip 5, बघा लुक आणि इतर डिटेल्स। Tech News
Galaxy Z Flip 5 पुढील आठवड्यात भारतात एका नव्या आकर्षक अवतारात उपलब्ध होईल.
नवीन येलो एडिशन आगामी दसरा आणि दिवाळी सणांशी संबंधित आहे.
Samsung ने 'Notify me' पृष्ठ देखील ठेवले आहे.
Samsung Galaxy Z Flip 5 स्मार्टफोन या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झाला होता. हा स्मार्टफोन सध्या चार कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. ज्यात मिंट, ग्रेफाइट, लॅव्हेंडर आणि क्रीम कलर ऑप्शन्स समाविष्ट आहे. जर तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवरून ते विकत घेतले तर तुम्ही ग्रे, ग्रीन आणि ब्लू कलर ऑप्शनमधूनही निवडू शकता. आता, Samsung ने घोषणा केली आहे की, Galaxy Z Flip 5 पुढील आठवड्यात भारतात एका नव्या आकर्षक अवतारात उपलब्ध होईल.
Samsung Galaxy Z Flip 5 चा नवा अवतार
साऊथ कोरियाची कंपनी Samsung ने X (ट्विटर) च्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. पोस्टमध्ये, कंपनीने लिहिले की, “This festive season, lights will guide you to the flip side” हे सूचित करते की, नवीन येलो एडिशन आगामी दसरा आणि दिवाळी सणांशी संबंधित आहे. म्हणजेच आगामी सणांमध्ये Samsung Galaxy Z Flip 5 चा नवा येलो एडिशन लाँच करण्यात येईल, अशी शक्यता आहे.
Samsung Galaxy Z Flip 5 ची यलो एडिशन 17 ऑक्टोबर 2023 रोजी लाँच होईल. सॅमसंगने ‘Notify me’ पृष्ठ देखील ठेवले आहे, जेथे इच्छुक ग्राहक या नवीन यलो एडिशनमध्ये त्यांची स्वारस्य रजिस्टर करू शकतात.
Samsung Galaxy Z Flip 5 ची भारतीय किंमत
Samsung Galaxy Z Flip 5 ची किंमत सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर 8GB + 256GB मॉडेलसाठी 99,999 रुपये इतकी आहे. तर, 8GB + 512GB व्हेरिएंटसाठी या फोनची किंमत 109,999 रुपये इतकी आहे.
Samsung Galaxy Z Flip 5
Samsungचा हा फ्लिप स्मार्टफोन 6.7-इंच लांबीचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा स्मार्टफोन ऍल्युमिनियम फ्रेमसह येतो. कव्हर स्क्रीनसाठी, यात 3.4-इंच लांबीचा सुपर AMOLED 60Hz डिस्प्ले आहे. Galaxy Z Flip 5 Android 13 वर आधारित One UI 5.1 स्किनवर चालतो.
या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 12MP + 12MP कॉन्फिगरेशन समाविष्ट आहे. तसेच, फोनमध्ये 10-मेगापिक्सलचा सेल्फी शूटर देखील आहे. त्याबरोबरच, पाण्याच्या प्रतिकारासाठी फोनला IPX8 रेटिंग मिळालेली आहे. डिव्हाइस 3700mAh बॅटरी पॅक करते, जी 25W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगच्या सपोर्टसह येते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile