फोनमध्ये Samsung Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 ऑक्टा कोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
फोनमध्ये 3,700 mAh बॅटरी वायर आणि वायरलेस चार्जिंग सुविधेसह दिली जाईल.
सॅमसंग आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy Z Flip 4 लाँच करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच, हा सॅमसंग फोन मॉडेल क्रमांक SM-F721B सह BIS (Buro of Indian Standards) च्या वेबसाइटवर सूचीबद्ध झाला आहे. या वेबसाइटवर या फोनशिवाय आणखी एक सॅमसंग मोबाइलही दिसला. दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सद्वारे Samsung Galaxy Z Flip 4 चे लीक फीचर्स समोर आले आहेत. येथे आम्ही तुम्हाला या लीक फीचर्सबद्दल सांगणार आहोत…
Galaxy Z Flip 3 प्रमाणे, Flip 4 मध्ये देखील ड्युअल कॅमेरा सेटअप मिळण्याची अपेक्षा आहे. यात 12 MP मुख्य कॅमेरा आणि 12 MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच, आकर्षक सेल्फीसाठी 10 MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये Samsung Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 ऑक्टा कोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
फ्लिप फोन असल्याने यात 2 डिस्प्ले स्क्रीन मिळतील. या फोनमध्ये 6.7 इंच स्क्रीनवर सुपर AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. 120 HZ चा डिस्प्ले रिफ्रेश रेट असण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy Z Flip 4 मध्ये दुसरी स्क्रीन 2.1 इंच असू शकते. यामध्ये देखील सुपर AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. फोनमध्ये 8 GB RAM आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज मिळेल.
कंपनी Samsung Galaxy Z Flip 4 फोनमध्ये 3,700 mAh बॅटरी देऊ शकते. यामध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा 25W वायर चार्जिंग आणि 10W वायरलेस चार्जिंगसह दिली जाऊ शकते. फोन Android 12 सह लॉन्च केला जाऊ शकतो. त्याबरोबरच, फोन 5G नेटवर्कसह लाँच होण्याची अपेक्षा आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.