सॅमसंग गॅलेक्सी वाइड स्मार्टफोन लाँच, १३ मेगापिक्सेलचा कॅमे-याने सुसज्ज

सॅमसंग गॅलेक्सी वाइड स्मार्टफोन लाँच, १३ मेगापिक्सेलचा कॅमे-याने सुसज्ज
HIGHLIGHTS

ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा फोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी सॅमसंगने बाजारात आपला नवीन फोन गॅलेक्सी वाइड लाँच केला. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसरसह क्वाड-कोर 1.2GHz प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 5.5 इंचाची HD डिस्प्ले दिली आहे.

हा फोन 2GB रॅम आणि 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा फोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. हा T-DMB सपोर्टसह येतो. ह्याचा मॉडल नंबर आहे SM-G600S.

हेदेखील वाचा – पावसाळ्याच्या दिवसात खूपच फायद्याचे ठरतील हे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स

ह्या फोनची किंमत KRW 319,000 (जवळपास २७५ डॉलर) आहे. हा फोन काही आठवड्यांपूर्वी साउथ कोरियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तथापि, हा फोन दुस-या देशांत कधी उपलब्ध होईल ह्याविषयी कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

हेदेखील वाचा –  लेनोवो Y700 गेमिंग लॅपटॉप भारतात लाँच, किंमत ९९,९९० रुपये
हेदेखील वाचा –  नासा: जूनो यानाने अखेर यशस्वीरित्या केला गुरुकक्षेत प्रवेश

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo