Samsung Galaxy Unpacked Event: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चा वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम Samsung Unpacked Event ची घोषणा करण्यात आली आहे. Samsung च्या वर्षातील सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक Unpacked Event ‘पॅरिस’मध्ये आयोजित केला जाणार आहे. नेहमीप्रमाणे, या कार्यक्रमात Samsung नेक्स्ट जनरेशन फोल्डेबल स्मार्टफोन सादर करण्याची अपेक्षा आहे. सॅमसंग अनपॅक्ड इव्हेंट पुढील महिन्यात होणार आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती-
Also Read: नवे Nokia 3210, Nokia 235 4G आणि Nokia 220 4G फोन भारतात लाँच, 3,000 रुपयांच्या बजेटमध्ये आहे किंमत
Samsung Galaxy Unpacked Event पुढील महिन्यात म्हणजे येत्या 10 जुलै 2024 रोजी आयोजित केला जाणार आहे. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग अनेक प्लॅटफॉर्मवर केले जाईल. हा कार्यक्रम Samsung.com आणि कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह पाहता येणार आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, ब्रँडने कार्यक्रमाच्या आमंत्रणात लिहले आहे की, Galaxy AI ची शक्ती शोधण्यासाठी सज्ज व्हा, आता नवीनतम Galaxy Z सिरीज आणि संपूर्ण Galaxy इकोसिस्टममध्ये एकत्रित झाली आहे. सॅमसंग नवीन इकोसिस्टम प्रोडक्ट्स तसेच नवीन Z-सिरीज उपकरणे सादर करेल.
अपेक्षेप्रमाणे, या इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold 6, Galaxy Z Flip 6, Galaxy Ring, Galaxy Watch Ultra आणि Galaxy Watch 7 सिरीज हे डिवाइस लाँच केली जातील. मात्र, लक्षात घ्या की, कंपनीचा Galaxy AI देखील Unpacked Event चा मुख्य आकर्षण बनू शकतो, असे म्हटले जात आहे. कंपनी नवीन AI फीचर्स सादर करणार आहे.
एवढेच नाही तर, या इव्हेंटमध्ये, कंपनी आपले पहिले स्मार्टवॉच Ultra नावाने सादर करू शकते. Samsung Galaxy Watch Ultra असे स्मार्टवॉचचे नाव असेल. या स्मार्टवॉचची तुलना Apple Watch Ultra 2 शी केली जाईल. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, याला swirl डिझाइनसह मॅट-फिनिश फ्रेमसह आणले जाऊ शकते.
आगामी Samsung Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 फोल्डेबल स्मार्टफोन्समध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आढळू शकतो. हे दोन्ही फोन 25W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येऊ शकतात. याशिवाय, कंपनी Samsung Galaxy Z Fold 6 मध्ये ब्लु, मिंट, यलो, सिल्व्हर शॅडो, व्हाईट आणि क्राफ्टेड ब्लॅक या कलर ऑप्शन्सचा समावेश असेल. तर, Galaxy Z Flip 6 फोन पिंक, नेव्ही, सिल्व्हर शॅडो, पीच, व्हाइट आणि क्राफ्टेड ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये मिळेल.