Samsung Galaxy Unpacked Event 2024: लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन्स होणार लाँच, केव्हा आणि कुठे पाहता येईल LIVE 

Samsung Galaxy Unpacked Event 2024: लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन्स होणार लाँच, केव्हा आणि कुठे पाहता येईल LIVE 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Unpacked Event 2024 पॅरिसमध्ये आज आयोजित केला गेला आहे.

इव्हेंटमध्ये कंपनी Samsung Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 स्मार्टफोन लाँच करणार

Samsung इव्हेंटमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन्ससोबत, गॅलेक्सी वॉच 7 आणि बड्स 3 इतर उपकरणे देखील सादर केले जातील.

Samsung चा वर्षातील सर्वात मोठा आणि बहुचर्चित Samsung Galaxy Unpacked इव्हेंट 2024 अवघ्या काही तासात सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीचा हा सर्वात मोठा मेगा इव्हेंट आहे, जो वर्षातून दोनदा आयोजित केला जातो. आज होणाऱ्या इव्हेंटमध्ये आता कंपनी आपले नेक्स्ट जनरेशन Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोल्डेबल स्मार्टफोन्ससोबत, Galaxy Watch 7 आणि Buds 3 देखील कार्यक्रमात सादर केले जातील. या कालावधीत कंपनी आपली स्मार्ट रिंग देखील सादर करू शकते.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीने जानेवारी 2024 मध्ये आयोजित Unpacked Event मध्ये Samsung Galaxy S24 सीरीज लाँच केली होती.

Also Read: Price Leak! लाँचपूर्वीच OnePlus Nord 4 ची किंमत झाली लीक, तुमच्या बजेटमध्ये येणार का नवा स्मार्टफोन?

Samsung Galaxy Unpacked Event केव्हा आणि कुठे बघता येईल?

Samsung Galaxy Unpacked Event 2024 पॅरिसमध्ये आज म्हणजेच 10 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दुपारी 3 वाजता CEST म्हणजेच भारतीय वेळेनुसार 6.30 वाजता सुरू होईल, जो कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. तुम्ही हा कार्यक्रम Samsung च्या अधिकृत YouTube आणि X (Twitter) हँडलवर लाईव्ह पाहू शकता. तुम्ही Samsung Galaxy Unpacked Event 2024 खाली दिलेल्या लिंकवर देखील बघू शकता.

Samsung Galaxy Z Fold 6

आज Samsung Galaxy Z Fold 6 फोन लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. फोनचे फीचर्स ऑनलाइन लीक झाले आहेत. या फोनमध्ये 7.6 इंच लांबीचा इनर डिस्प्ले आणि कव्हर डिस्प्ले 6.3 इंच लांबीचा असू शकतो. यामध्ये एस-पेनचा सपोर्टही मिळू शकतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. तर, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी 10MP फ्रंट कॅमेरा मिळण्याची अपेक्षा आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 4400mAh बॅटरी मिळेल.

Samsung Galaxy Z Fold 6 and Z Flip 6 latest leak reveals almost everything
Samsung Galaxy Z Flip 5

Samsung Galaxy Z Flip 6

लीकनुसार, Samsung Galaxy Z Flip 6 फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा प्रायमरी डिस्प्ले आणि कव्हर डिस्प्ले मागील मॉडेलसारखे असू शकते. चांगल्या परफॉर्मन्ससाठी हा फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि सेल्फीसाठी 10MP कॅमेरा देखील असू शकतो. त्याबरोबरच, या फोनमध्ये 4000mAh बॅटरी असू शकते, ज्यामध्ये 35W फास्ट चार्जिंग सपोर्ट असू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo