Samsung Galaxy Unpacked 2025: वर्षातील पहिल्या मोठ्या इव्हेंटची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी लाँच होणार Galaxy S25 सिरीज? 

Samsung Galaxy Unpacked 2025: वर्षातील पहिल्या मोठ्या इव्हेंटची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी लाँच होणार Galaxy S25 सिरीज? 
HIGHLIGHTS

Samsung च्या 2025 नवीन वर्षातील पहिल्या Samsung Galaxy Unpacked इव्हेंटची तारीख जाहीर

Samsung Galaxy Unpacked साठी प्री-रिझर्व्हेशन आजपासून सुरू झाले आहे.

सिरीजअंतर्गत Samsung Galaxy S25, Galaxy S25+ आणि Galaxy S25 Ultra तीन स्मार्टफोन लाँच करणार

Samsung Galaxy Unpacked 2025: अखेर साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung च्या 2025 नवीन वर्षातील पहिल्या सर्वात मोठ्या Samsung Galaxy Unpacked इव्हेंटची तारीख अखेर जाहीर झाली आहे. या इव्हेंटमध्ये सॅमसंग आपली फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Samsung Galaxy S25 सीरीज लाँच करेल, असे बोलले जात आहे. या सीरीजअंतर्गत, कंपनी Samsung Galaxy S25, Galaxy S25+ आणि Galaxy S25 Ultra तीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. जाणून घेऊयात या इव्हेंटचे संपूर्ण तपशील-

Samsung Galaxy Unpacked 2025 Event

Samsung चा या वर्षातील पहिला इव्हेंट Samsung Galaxy Unpacked 2025 येत्या 22 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कार्यक्रम सॅन जोस येथे होणार आहे. Samsung च्या यूट्यूब चॅनेल, Samsung.com, सॅमसंग न्यूज रूमवर ते लाईव्ह स्ट्रीम केले जाईल. हा इव्हेंट 11:30 PM IST वाजता सुरू होईल.

याव्यतिरिक्त, Samsung Galaxy Unpacked साठी प्री-रिझर्व्हेशन आजपासून सुरू झाले आहे. कंपनीने या इव्हेंटचा टीझर देखील जारी केला आहे. या इव्हेंटसाठी 1,999 रुपयांमध्ये प्री-ऑर्डर करता येणार आहे. प्री-रिझर्वेशन करणाऱ्या ग्राहकांना 5000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील, असा कंपनीचा दावा आहे.

इव्हेंटमध्ये ‘ही’ उपकरणे होणार लाँच

कंपनी Samsung Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये आगामी बहुप्रतीक्षित स्मार्टफोन सिरीज Samsung Galaxy S25 सीरीज लाँच करणार आहे. मात्र, कंपनीने याबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सीरीज अंतर्गत नवीन हँडसेट Galaxy S25 Slim देखील लाँच होण्याची अपेक्षा आहे. तसेच, कंपनी सिरीजअंतर्गत Samsung Galaxy S25, Galaxy S25+ आणि Galaxy S25 Ultra तीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.

Samsung Galaxy S25 series- Samsung Galaxy Unpacked 2025

लीकनुसार, या सिरीजमधील सर्व स्मार्टफोन्स नुकतेच लाँच झालेलाQualcomm Snapdragon 8 Elite चिपसेट मिळणार आहे. याशिवाय, सीरिजच्या अल्ट्रा मॉडेलमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत अंतर्गत स्टोरेजद त्याबरोबरच, या सिरीजमध्ये अपग्रेडेड कॅमेरा सेटअप मिळण्याची देखील अपेक्षा आहे. यात नवीन 50MP 3x टेलीफोटो लेन्स देखील समाविष्ट असेल. मात्र, फोनचे कन्फर्म फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo