Samsung Galaxy Unpacked 2024: ‘या’ दिवशी होणार मेगा इव्हेंट, कंपनीचे Popular आगामी स्मार्टफोन्स होतील लाँच। Tech News 

Samsung Galaxy Unpacked 2024: ‘या’ दिवशी होणार मेगा इव्हेंट, कंपनीचे Popular आगामी स्मार्टफोन्स होतील लाँच। Tech News 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Unpacked 2024 ची तारीख जाहीर

इव्हेंटचा प्रमोशनल व्हीडिओ 'Galaxy AI is coming’ यासह टीज केला जात आहे.

Samsung Galaxy Unpacked 2024 इव्हेंट या महिन्यात 17 जानेवारीला होणार

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच Samsung ने आपल्या सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय इव्हेंटची घोषणा केली आहे. होय, Samsung Galaxy Unpacked 2024 ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या मेगा इव्हेंटची थीम AI वर आधारित आहे. त्याचा प्रमोशनल व्हिडिओ देखील ‘Galaxy AI is coming’ अशाप्रकारे टीज केला जात आहे. यासह, Samsung Galaxy S24 सीरीज स्मार्टफोनमध्ये AI फीचर्स दिसू शकतात, अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, अजूनही कंपनीने आगामी सीरीजच्या लाँचबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही.

Samsung Galaxy Unpacked 2024

कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे की, Samsung Galaxy Unpacked 2024 इव्हेंट या महिन्यात म्हणेजच येत्या 17 जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे स्ट्रीमिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर असेल. हा इव्हेंट तुम्ही रात्री 11.30 वाजल्यापासून ते LIVE बघू शकता.

एवढेच नाही तर, Samsung India ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर लाँच होण्यापूर्वीच फोनसाठी प्री-रिझर्व्ह पासेस 1,999 रुपयांमध्ये विकणे सुरू केले आहे. हा पास खरेदी करून फोन प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना तब्बल 5,000 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.

Samsung Galaxy S24 सीरीज

पुढे आलेल्या अहवालानुसार, Samsung Galaxy S24 सीरीज अंतर्गत Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra हे तीन स्मार्टफोन्स लाँच केले जातील. या तिन्ही फोनमध्ये वेगवेगळ्या आकाराचे स्क्रीन उपलब्ध असतील. या तिन्ही स्मार्टफोन्समध्ये Snapdragon 8 Gen 3 किंवा Exynos 2400 चिपसेट देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

सीरिजच्या स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध असलेल्या कॅमेरा विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, Galaxy S24 आणि S24 Plus मध्ये 50MP कॅमेरा दिला जाईल, त्यासह युजर्स हाय कॉलिटी इमेजेस आणि 8K व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम असतील. तर, Galaxy S24 Ultra मध्ये 200MP कॅमेरा असेल, जो अधिक चांगल्या झूमसह येईल. सर्व तीन उपकरणांमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरे असण्याची अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo