Samsung Galaxy Unpacked 2023 इव्हेंट पुढील महिन्यात कन्फर्म, लाँच होणार नवे प्रोडक्ट्स
कंपनी पुढील Galaxy Unpacked इव्हेंट जुलैमध्ये आयोजित करणार आहे.
इव्हेंटदरम्यान Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 लाँच होण्याची शक्यता
कार्यक्रमाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
साऊथ कोरियन कंपनी Samsung ची उपकरणे भारतात लोकप्रिय आहेत. हँडसेट निर्माता सॅमसंगने पुष्टी केली आहे की, कंपनी या वर्षी ऑगस्ट नाही तर जुलैमध्ये आपला पुढील Galaxy Unpacked इव्हेंट आयोजित करणार आहे. या इव्हेंट दरम्यान सॅमसंग दरवर्षी आपल्या नवीन डिव्हाइसचे अनावरण करते आणि या वर्षी देखील कंपनीच्या नवीन फोल्डेबल डिव्हाइसचे अनावरण करण्यात येणार आहे.
कोणते नवे प्रोडक्ट लाँच होण्याची शक्यता ?
या इव्हेंट दरम्यान कोणते प्रोडक्ट्स लाँच होऊ शकतात, याबद्दल सॅमसंगने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु हे निश्चितपणे स्पष्ट केले गेले आहे की, कंपनी पुढील महिन्यात होणाऱ्या या अनपॅक्ड इव्हेंटमध्ये नेक्स्ट जनरेशनचा फोल्डेबल फोन लाँच करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आगामी Galaxy Unpacked इव्हेंटदरम्यान Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 लाँच करेल.
Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 चे अपेक्षित स्पेक्स
Samsung Galaxy Z Fold 5 फोनमध्ये 108MP + 12MP + 10MP ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम आणि 10MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 2 SoC सह सुसज्ज असण्याची अपेक्षा आहे. तर, Galaxy Z Flip 5 फोनच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये दोन 12MP कॅमेरे असतील. काही मार्केटमध्ये हे उपकरण स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेटद्वारे समर्थित केले जाऊ शकते.
हा इव्हेंट कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या तारखेला आयोजित केला गेला आहे, याबाबत अद्याप स्पष्टपणे काही माहिती मिळालेली नाही.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile