आज आपण Samsung च्या नेक्स्ट जनरेशनमधील फोल्डेबल्स म्हणजेच Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 चे लॉन्चिंग पाहू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये ही उपकरणे समोर आली आहेत. हा कार्यक्रम आज संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम सॅमसंगच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर तसेच सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. Galaxy Buds 2 Pro आणि Galaxy Watch 5 सिरीज देखील कार्यक्रमात लाँच केले जाऊ शकतात.
हे सुद्धा वाचा : जाणून घ्या, BSNL आणि रिलायन्स JIO च्या 'या' प्लॅन्समधील फरक, किंमत 250 रुपयांपेक्षा कमी
जर तुम्हाला हा कार्यक्रम पाहण्यात काही रस असेल, तुम्ही या इव्हेंटचा लाईव्ह स्ट्रीम सॅमसंग न्यूजरूम यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. याशिवाय, तुम्ही सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर देखील हा कार्यक्रम बघू शकता. हा कार्यक्रम आज संध्याकाळी 6:30 वाजता होणार आहे.
लीक झालेल्या अहवालानुसार, तुम्हाला 1,46,400 रुपयांमध्ये 256GB स्टोरेज असलेला Galaxy Fold 4 मिळू शकतो, याशिवाय 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,919 EUR असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, Galaxy Z Flip 4 ची किंमत 128GB व्हेरिएंटसाठी EUR 1,109 आणि 256GB व्हेरिएंटसाठी EUR 1,169 म्हणजेच अंदाजे 95,100 रुपये असू शकते.
Samsung Galaxy Watch 5 ची किंमत 40mm स्क्रीनसाठी 299 युरो आणि 4G व्हेरिएंटसाठी 349 युरो असू शकते. Galaxy Watch 5 (44mm) ची किंमत ब्लूटूथ व्हेरिएंटसाठी EUR 329 आणि 4G मॉडेलसाठी EUR 379 असण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy Buds 2 Pro ची किंमत $230 असू शकते.