लोकप्रिय Samsung Galaxy Tab S8 च्या किमतीत प्रचंड मोठी कपात, महागड्या टॅबलेटवर हजारोंची बचत करा। Tech News 

लोकप्रिय Samsung Galaxy Tab S8 च्या किमतीत प्रचंड मोठी कपात, महागड्या टॅबलेटवर हजारोंची बचत करा। Tech News 
HIGHLIGHTS

महागड्या Samsung Galaxy Tab S8 टॅबलेटच्या किमतीत कपात

कंपनीने या वर्षी जुलैमध्ये Samsung Galaxy Tab S9 टॅब लाँच केला होता.

कंपनीने आता या मॉडेलची किंमत 4000 रुपयांनी कमी केली आहे.

Samsung ची उपकरणे भारतीय ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. Samsung च्या टॅब्लेट्सना देखील भारतीय ग्राहकांनी भरपूर पसंती मिळवली आहे. आज आम्ही ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. महागड्या Samsung Galaxy Tab S8 टॅबलेटची किंमत भारतात कमी करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने या वर्षी जुलैमध्ये Samsung Galaxy Tab S9 टॅब लाँच केला होता. त्यानंतर आता कंपनीने Samsung Galaxy Tab S8 स्वस्त केला आहे.

हे सुद्धा वाचा: Jio च्या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटासह 2GB डेटा Free, OTT सब्स्क्रिप्शनसह किंमतही कमी। Tech News

SAMSUNG GALAXY TAB IN AMAZON SALE

Samsung Galaxy Tab S8 ची नवी किंमत

Samsung Galaxy Tab S8 दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला जातो. टॅबच्या Wi-Fi व्हेरियंटची किंमत काही महिन्यांपूर्वी कमी करण्यात आली होती. तर, त्याच्या 5G मॉडेलची किंमत आता डिसेंबरमध्ये कमी करण्यात आली आहे.

होय, या टॅबच्या 128GB 5G व्हेरिएंटची किंमत 70,999 रुपये आहे. कंपनीने आता या मॉडेलची किंमत 4000 रुपयांनी कमी केली आहे. यानंतर टॅबची नवी किंमत आता 66,999 रुपये इतकी झाली आहे. या सॅमसंग टॅबमध्ये ग्रेफाइट, सिल्व्हर आणि पिंक गोल्ड कलर ऑप्शन उपलब्ध आहेत.

Samsung Galaxy Tab S8

samsung galaxy tab a9

Samsung Galaxy Tab S8 मध्ये 11 इंच लांबीचा WQXGA डिस्प्ले आहे. तसेच, परफॉर्मन्ससाठी हे Snapdragon 8th Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. सुरक्षेसाठी, या सॅमसंग टॅबमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या टॅबमध्ये 5G आणि 4G LTE पर्याय उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, यात ब्लूटूथ v5.2, GPS आणि USB टाइप-C पोर्ट आहे.

फोटोग्राफीसाठी या टॅबमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13MP प्राथमिक कॅमेरा आणि 6MP अल्ट्रा-वाइड सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी टॅबमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा आहे. टॅबची बॅटरी 8000mAh आहे, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo