Samsung Smartphones Price Cut: एकत्र स्वस्त झाले कंपनीचे Popular स्मार्टफोन, किमतीत प्रचंड मोठी कपात। Tech News 

Samsung Smartphones Price Cut: एकत्र स्वस्त झाले कंपनीचे Popular स्मार्टफोन, किमतीत प्रचंड मोठी कपात। Tech News 
HIGHLIGHTS

Samsung ने Galaxy M आणि F सीरिजचे स्मार्टफोन स्वस्त केले आहेत.

लोकप्रिय सिरीज Samsung Galaxy S23, S23+ च्या फोन्सची किंमत देखील कमी केली आहे.

अलीकडेच लाँच झालेल्या Samsung Galaxy a05s स्मार्टफोनच्या किमतीत देखील घट

मागील काही काळापासून Samsung आपल्या स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात करत आहे. कंपनीने Galaxy M आणि F सीरिजचे स्मार्टफोन स्वस्त केले आहेत. या स्मार्टफोन्सच्या यादीमध्ये Samsung Galaxy M14, Samsung Galaxy M04, Samsung Galaxy F14 आणि Samsung Galaxy F04 यांचा समावेश आहे. या स्मार्टफोन्सच्या नवीन किंमती Amazon India, Flipkart आणि कंपनीच्या साइटवर लाइव्ह देखील झाल्या आहेत.

दरम्यान, कालांतराने Samsung Galaxy S23, S23+ आणि नुकतेच लाँच झालेल्या Samsung Galaxy a05s स्मार्टफोनच्या किमतीत देखील घट करण्यात आली होती. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घ्या सर्व फोन्सच्या नव्या किमती-

SAMSUNG GALAXY M14 5G
SAMSUNG GALAXY M14

Samsung Galaxy M14

कंपनी सॅमसंग गॅलेक्सी M14 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. फोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,490 रुपये होती, पण आता त्याची किंमत 12,490 रुपयांवर आली आहे. तसेच, यात 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट देखील आहे, ज्याची किंमत कपातीनंर 13,990 रुपये झाली आहे.

Samsung Galaxy F14

Samsung Galaxy F14 स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटसह येतो. फोनच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची नवी किंमत 11,990 रुपये इतकी आहे. तर, त्याचा 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 15,990 रुपयांना मिळत होता, आता त्याची किंमत 13,490 रुपये झाली आहे.

Samsung Galaxy M04 आणि F04

Samsung Galaxy M04 फोनच्या सिंगल 4GB RAM + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे, जी आता 500 रुपयांनी स्वस्त झाली आहे. दुसरीकडे, Galaxy F04 ची किंमत देखील 7,999 रुपये आहे, जी आता 1700 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Samsung galaxy s23

Samsung Galaxy S23 आणि S23+ ची नवी किंमत

Samsung Galaxy S24 सिरीज येण्यापूर्वी कंपनीने Galaxy S23 आणि Galaxy S23+ च्या किमतीत 10,000 रुपयांची घट केली आहे. यापूर्वी, Samsung Galaxy S23 5G च्या 128GB मॉडेलची किंमत 74,999 रुपये होती आणि 256GB मॉडेल 79,999 रुपयांना उपलब्ध होते. मात्र, कपातीनंतर हे मॉडेल्स अनुक्रमे 64,999 आणि 69,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

पूर्वी Samsung Galaxy S23+ फोनच्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 94,999 रुपये आणि 512GB मॉडेलची किंमत 1,04,999 रुपये होती. मात्र, 10,000 रुपयांच्या कपातीनंतर हे स्मार्टफोन्स 84,999 आणि 94,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. दोन्ही स्मार्टफोनची नवीन किंमत प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर लाइव्ह झाली आहे.

Samsung Galaxy A05s ची नवी किंमत

Samsung Galaxy A05s फोन 4GB आणि 6GB RAM व्हेरिएंटमध्ये येतो. यापैकी, 4GB आवृत्तीच्या किंमतीत 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे आणि 6GB व्हेरिएंटची किंमत 2000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कपातीनंतर Galaxy A05s चा बेस म्हणजेच 4GB व्हेरिएंट 11,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, फोनच्या 6GB व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये इतकी झाली आहे. हा हँडसेट लाइट ग्रीन, लाइट व्हायलेट आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

आम्ही सांगितल्याप्रमाणे, सर्व फोनच्या नवीन किंमती Amazon India, Flipkart आणि कंपनीच्या साइटवर लाइव्ह झाल्या आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo