Samsung Galaxy S9 येऊ शकतो स्टीरियो स्पीकर आणि एडवांस 3D इमोजी सह

Samsung Galaxy S9 येऊ शकतो स्टीरियो स्पीकर आणि एडवांस 3D इमोजी सह
HIGHLIGHTS

Galaxy S9 मध्ये 2 स्पीकर असू शकतात, एक टॉप ला आणि दूसरा बॉटम ला. हा 3D इमोजी सह येऊ शकतो, ज्या अॅनिमोजीस सारख्या असू शकतात.

सॅमसंग आपल्या 2018 फ्लॅगशिप स्मार्टफोन, Galaxy S9 आणि S9 Plus चे अनावरण MWC 2018 मध्ये करेल. अधिकृत अनावरण होण्याआधी, Galaxy S9 चे काही डिटेल्स समोर आले आहेत. ईटीएन्यूज च्या एका रिपोर्ट नुसार, या स्मार्टफोन मध्ये स्टीरियो स्पीकर ची नवीन सुविधा आणि 3D इमोजी असतील, जे कदाचित iPhone X च्या इमोजी पेक्षा जास्त एडवांस असतील.

रिपोर्ट नुसार, स्मार्टफोन सध्या मोबाईल टेलीकॉम कंपन्यांच्या क्वालिटी टेस्टिंग मधून जात आहेत. अंदाज लावला जातोय की Galaxy S9 दोन स्पीकर सह येईल, एक डिवाइस च्या वरच्या बाजूस आणि दूसरा खालच्या बाजूस असेल, जो इयरपीस सोबत असू शकतो. याआधी फोन मध्ये फक्त खालच्या बाजूस एक स्पीकर होता. 
हा डिवाइस 3D इमोजी सह येऊ शकतो, जे अॅप्पल च्या अॅनिमोजी सारखे असतिल. रिपोर्ट नुसार, अॅनिमोजी सारखे ह्या एका यूजरचा चेहरा स्कॅन करून 3D अॅनिमेटेड कॅरेक्टर बनवतात. 
आधी आलेल्या लीक नुसार Samsung Galaxy S9 आणि S9 Plus मध्ये क्रमश: 5.65 इंच आणि 6.1 इंचाचा डिस्प्ले असेल. हे 2 प्रोसेसर वेरियंट मध्ये येऊ शकतात, एक क्वॉलकॉम च्या लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 845 आणि दूसरा सॅमसंग च्या एक्सिनोस 9810 SoC सह येईल. हे दोन्ही फोन एंड्रॉयड 8.0 ओरियो वर चालतील आणि यांच्यात रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर असेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo