Samsung Galaxy S9, S9+ झाले भारतात लॉन्च

Updated on 07-Mar-2018
HIGHLIGHTS

Galaxy S9 सीरीज चे स्मार्टफोंस 16 मार्च पासून सेल साठी उपलब्ध होतील.

सॅमसंग ने काल भारतीय स्मार्टफोन बाजारात Galaxy S9 आणि S9+ ला लॉन्च केले आहे. डिजाइन नुसार यात काही नवीन नाही, पण आता हे जास्त चांगल्या कॅमेरा सह सादर करण्यात आले आहेत. ही दोन्ही डिवाइस Exynos 9810 चिपसेट सह येतात. 
सॅमसंग ने Galaxy S9 च्या 64GB स्टोरेज वेरियंट ची किंमत Rs. 57,900 ठेवली आहे आणि याच्या 256GB वेरियंट ची किंमत Rs. 65,900 आहे. तसेच Galaxy S9 Plus च्या 64GB वेरियंट ची किंमत Rs. 64,900 आहे आणि याच्या 256GB वेरियंट साठी तुम्हाला Rs. 72,900 ची किंमत द्यावी लागेल. 
हे दोन्ही स्मार्टफोंस 16 मार्च पासून सेल साठी उपलब्ध होतील आणि याना आता पासूनच ऑनलाइन प्री-बुक केले जाऊ शकते. प्री-बुकिंग सॅमसंग शॉप, फ्लिपकार्ट वरून केली जाऊ शकते. तसेच काही निवडक सॅमसंग ऑफलाइन स्टोर्स मधून पण बुक केले जाऊ शकते. Galaxy S9 आणि S9+ मधील फीचर्स वर नजर टाकू या, Galaxy S9 मध्ये 5.8-इंचाचा क्वाड HD+ कर्व्ड सुपर AMOLED डिस्प्ले असेल, तर S9+ मध्ये 6.2-इंचाचा क्वाड HD+ कर्व्ड सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोंस IP68 सर्टिफाइड आहेत. Galaxy S9 मध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, तर S9+ मध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. दोन्ही फोंस मध्ये समोरच्या बाजूला 8MP चा कॅमेरा आहे. 
Galaxy S9 मध्ये 4GB रॅम सह 64GB/128GB/256GB स्टोरेज चे ऑप्शन उपलब्ध आहेत आणि याची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400GB पर्यंत वाढवता येते. तसेच S9+ मध्ये 6GB रॅम सह 64GB/128GB/256GB स्टोरेज चे ऑप्शन देण्यात आले आहेत, याची स्टोरेज पण माइक्रोएसडी कार्ड ने 400GB पर्यंत वाढवता येते. 

Galaxy S9 मध्ये 3000mAh ची बॅटरी आहे, तर S9+ मध्ये 3500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फास्ट वायर्ड चार्जिंग ला सपोर्ट करतात. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :