MWC 2018 मध्ये सॅमसंग ने आपले दोन नवीन स्मार्टफोंस Galaxy S9 आणि Galaxy S9 Plus सादर केले आहेत. Galaxy S9 आणि S9+ मिडनाइट ब्लॅक, टाइटेनियम ग्रे, कोरल ब्लू आणि एक नव्या लीलक पर्पल रंगात उपलब्ध होतील.
कंपनी ने घोषणा केली होती की हे की हँडसेट्स US मध्ये 16 मार्च पासून सेल साठी उपलब्ध होतील, पण भारतातील याची किंमत आणि उपलब्धता याबाबत काही सांगितले नव्हते. पण आता हे स्मार्टफोंस भारतात प्री-ऑर्डर्स साठी उपलब्ध झाले आहेत ज्यासाठी ग्राहकांना Rs 2,000 चे अॅडवांस पेमेंट करावे लागेल. Galaxy S9 आणि S9 Plus फोंसना कंपनी च्या निवडक ऑफलाइन स्टोर्स आणि ऑनलाइन स्टोर्स वरून विकत घेतले जाऊ शकते.
या स्मार्टफोंस ची प्री-बुकिंग काही निवडक सॅमसंग स्टोर्स वर उपलब्ध आहे. ग्राहकांना स्टोर मध्ये जावे लागेल आणि Rs 2,000 ची प्री-बुकिंग अमाउंट द्यावी लागेल. तसेच ग्राहकांना आपले नाव, ईमेल-आयडी आणि फोन नंबर अशी माहिती द्यावी लागेल आणि त्यानंतर स्मार्टफोन उपलब्ध झाल्यावर ग्राहकांना कॉन्टेक्ट केला जाईल.
US मध्ये Samsung Galaxy S9 आणि S9 Plus ची किंमत क्रमश: $719.99 (जवळपास Rs 46,600) आणि $839.99 (जवळपास Rs 54,400) असेल.
Galaxy S9 मध्ये 5.8-इंचाचा क्वाड HD+ कर्व्ड सुपर AMOLED डिस्प्ले आहे., तर S9+ मध्ये 6.2-इंचाचा क्वाड HD+ कर्व्ड सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोंस IP68 सर्टिफाइड आहेत. Galaxy S9 मध्ये सिंगल रियर कॅमेरा आहे, तर S9+ मध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. दोन्ही फोंस मध्ये समोरच्या बाजूस 8MP चा कॅमेरा आहे.
Galaxy S9 मध्ये 4GB रॅम सह 64GB/128GB/256GB स्टोरेज चे ऑप्शन उपलब्ध आहेत आणि याची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400GB पर्यंत वाढवता येईल. तर S9+ मध्ये 6GB रॅम सह 64GB/128GB/256GB स्टोरेज चा ऑप्शन देण्यात आले आहेत, याची स्टोरेज पण माइक्रोएसडी कार्ड ने 400GB पर्यंत वाढवता येईल.
Galaxy S9 मध्ये 3000mAh ची बॅटरी आहे, तर S9+ मध्ये 3500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही पण फास्ट वायर्ड चार्जिंग ला सपोर्ट करतात.