Samsung Galaxy S9 आणि Galaxy S9+ ला काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आले होते आणि थोड्याच वेळात यांना हा अपडेट देण्यात आला आहे. या अपडेट नंतर या स्मार्टफोंस च्या दोन सर्वात मोठ्या फीचर्स मध्ये स्टेबिलिटी आली आहे.
ड्रोइडलाइफ च्या एका रिपोर्ट नुसार ही माहिती समोर आली आहे. त्यांनी या अपडेट चा एक स्क्रीनशॉट पण शेयर केला आहे, जो तुम्ही इथे खाली बघू शकता. याव्यतिरिक्त सांगण्याची बाब म्हणजे या अपडेट ची साइज 286MB आहे. सॅमसंग गॅलेक्सी S9 मध्ये हा अपडेट सॉफ्टवेयर वर्जन G960U1UEU1ARBG नावाने आला आहे, तसेच सॅमसंग गॅलेक्सी S9+ साठी हा G965U1UEU1ARBG नावाने आला आहे.
या अपडेट मध्ये सॅमसंग ने काही स्टेबल बदल जारी केले आहेत जसे की याच्या फेस अनलॉक फीचर मध्ये मोठा सुधार दिसला आहे, तसेच याच्या कॅमेरा मध्ये पण खुप सुधार बघायला मिळतील. याव्यतिरिक्त या स्मार्टफोंस मधील अन्य काही बग्स पण फिक्स करण्यात आले आहेत.
तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की या अपडेट मध्ये सॅमसंग गॅलेक्सी S9 स्मार्टफोन ला फेब्रुवारीचा सिक्यूरिटी पॅच पण मिळाला आहे. या अपडेट बद्दल तुम्हाला काही माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या सॅमसंग गॅलेक्सी S9 च्या सेटिंग मध्ये जाऊन याला चेक करु शकता.
Galaxy S9 आणि S9+ मधील फीचर्स पाहता, Galaxy S9 मध्ये 5.8-इंचाचा क्वाड HD+ कर्व्ड सुपर AMOLED डिस्प्ले आहे, तर S9+ मध्ये 6.2-इंचाचा क्वाड HD+ कर्व्ड सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोंस IP68 सर्टिफाइड आहेत. Galaxy S9 मध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, तर S9+ मध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. दोन्ही फोंस मध्ये समोरच्या बाजूस 8MP चा कॅमेरा आहे.
Galaxy S9 मध्ये 4GB रॅम सह 64GB/128GB/256GB स्टोरेज चे पर्याय उपलब्ध आहेत आणि याची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. तर S9+ मध्ये 6GB रॅम सह 64GB/128GB/256GB स्टोरेज चे पर्याय देण्यात आले आहेत, याची स्टोरेज पण माइक्रोएसडी कार्ड ने 400GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.