सॅमसंगने आपले दोन नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स भारतात लाँच केले आहे. गॅलेक्सी S7 ला ५.१ इंचाची QHD डिस्प्ले देण्यात आली असून ह्याची किंमत ४८,९०० रुपये आहे. तर S7 एज मध्ये ५.५ इंचाची QHD कर्व्ह्ड एज डिस्प्लेसह ५६,९०० रुपयात लाँच झाला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स आपण १८ मार्चपासून खरेदी करु शकता. त्याचबरोबर त्याची प्री-बुकिंग कालपासून म्हणजेच मंगळवारपासून सुरु झाली असून ती १७ मार्चपर्यंत चालेल. आणि जे कोणी ह्या स्मार्टफोन्ससाठी प्री-बुकिंग करतील, त्यांना सॅमसंगचा Gear VR हेडसेट मोफत मिळणार आहे. ह्या दोन्ही स्मार्टफोन्सला कंपनीने MWC 2016 मध्ये लाँच केले होते.
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये आपल्याला QHD डिस्प्ले मिळत आहे. गॅलेक्सी S7 ५.१ इंचाची QHD डिस्प्लेसह आणि S7 एज 5.5 इंचाच्या QHD कर्व्ह्ड एज डिस्प्लेसह लाँच झाला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये एक्सीनोस 8890 प्रोसेसरसह ४जीबीची रॅम दिली गेली आहे. त्याचबरोबर आपल्याला 32GB चे स्टोरेजसुद्धा दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मिळत आहे. ह्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकता. फोन्समध्ये मागील बाजूस १२ मेगापिक्सेलचा ड्यूल पिक्सेल कॅमेरा f/1.7 अॅपर्चर लेन्ससह आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा वाइड अँगल्ससह मिळत आहे.
तसेच सॅमसंग गॅलेक्सी S7 मध्ये आपल्याला 3000mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे, तर S7 एजमध्ये आपल्याला थोडी मोठी म्हणजेच 3600mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे. दोन्ही स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड 6.0 मार्शमेलोवर काम करतात. दोघांमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला गेला आहे. त्याशिवाय दोन्ही स्मार्टफोन्स वॉटरप्रुफ आहे, जे IP68 प्रमाणित आहे. त्याशिवाय हे स्मार्टफोन्स ३० मिनिटांपर्यंत 1.5 मीटर पाण्यात राहू शकतात. तसेच हे दोन्ही स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड 6.0 मार्शमेलोवर काम करतात.
हेदेखील वाचा – सध्या सर्वत्र चर्चेत असलेले ३ उत्कृष्ट स्मार्टफोन्स आणि त्यांची तुलना
हेदेखील वाचा – सहा T20 वर्ल्ड कप स्टेडियम्समध्ये रिलायन्स जिओ देणार अनलिमि़टेड फ्री वायफाय