सॅमसंगने मागील आठवड्यात भारतात लाँच होणारे आपले दोन स्मार्टफोन्स सॅमसंग गॅलेक्सी S7 आणि S7 एजसाठी निमंत्रण पाठवणे सुरु केले होते. आणि ह्या स्मार्टफोन्स भारतात लाँच होण्याच्या तयारीत आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स आज भारतात लाँच होणार आहे. ह्या दोन्ही स्मार्टफोन्सला MWC 2016 मध्ये लाँच केले होते.
ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये क्रमश: ५.१ इंच आणि ५.५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, जो 2K रिझोल्यूशन सह मिळत आहे. जसे की आपल्याला माहितच आहे की, स्मार्टफोन्समध्ये एक्सीनोस 8890 प्रोसेसर दिला गेला आहे. हा एक ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर हे पहिल्यांंदा होत आहे की, जेथे सॅमसंग कस्टम चिपसह बाजारात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही स्मार्टफोन्समध्ये आपल्याला 4GB रॅम मिळत आहे. त्याशिवाय 32GB चे अतर्गत स्टोरेज, त्याचबरोबर दोन्ही स्मार्टफोन्स मायक्रो-एसडी कार्डसह बाजारात आले आहे.
ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 12 मेगापिक्सेलचा ड्यूल-पिक्सेल सेंसर दिला आहे आणि सॅमसंगचे असे म्हणणे आहे की, ह्यात ५६ टक्क्यांपेक्षा जास्त लाइट आहे. हा f/1.7 अॅपर्चर सह येतो. त्याचबरोबर हा खूपच लहान आहे. त्याशिवाय ह्यात ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्याच्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर, दोन्ही स्मार्टफोन्समध्ये वेगवेगळी बॅटरी दिली गेली आहे. जसे की गॅलेक्सी S7 मध्ये 3000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. तर दुस-या स्मार्टफोनमध्ये 3600mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.
हे दोन्ही स्मार्टफोन्स वॉटरप्रुफ आहे. हे IP68 प्रमाणित आहेत. त्याशिवाय हे स्मार्टफोन्स ३० मिनिटांपर्यंत 1.5 मीटर पाण्यात राहू शकतात. तसेच हे दोन्ही स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड 6.0 मार्शमेलोवर काम करतात.
हेदेखील वाचा – भारतातील १० सर्वोत्कृष्ट मायक्रोवेव ओवन्स
हेदेखील वाचा – सहा T20 वर्ल्ड कप स्टेडियम्समध्ये रिलायन्स जिओ देणार अनलिमि़टेड फ्री वायफाय