मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी S7 लाँच करु शकतो. हा स्मार्टफोन सॅमसंगच्या नवीन चिपसेटने सुसज्ज असेल अशा बातम्या मिळत आहे. कंपनी नवीन चिपसेट एक्सनोस 8890 वर काम करत आहे आणि आशा आहे की, ह्या चिपसेटवर सर्वात आधी सॅमसंग गॅलेक्सी S7 ला लाँच केला जाऊ शकतो. एक्सनोस 8890 चिपसेट ह्या वर्षी डिसेंबरपर्यंत उपलब्ध होऊ शकतो.
सॅमसंगने अधिकृतरित्या ह्याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. ह्या बातमीला सर्वात आधी बिजनेस कोरियाने प्रकाशित केले आहे. गॅलेक्सी S7 तीन वेगवेगळ्या चिपसेट प्रकारात उपलब्ध होऊ शकतो. ह्यात एक प्रकार एक्सनोस 8890 वर आधारित असेल. ज्यात दुसरा मॉडेल क्वालकॉमच्या येणा-या स्नॅपड्रॅगन ८२० सह उपलब्ध होऊ शकतो.
मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग आपला स्मार्टफोन गॅलेक्सी S7 जानेवारीत लाँच करु शकतो. सॅमसंग गॅलेक्सी S7 स्मार्टफोनच्या लाँचशी संबंधित माहिती कोरियाची वेबसाइट ईटीन्यूजने दिली आहे. वेबसाइटनुसार सॅमसंग गॅलेक्सी S7 ला जानेवारी २०१६ मध्ये लाँच केले जाऊ शकते. ही तीच वेबसाइट आहे ज्याने सॅमसंग गॅलेक्सी नोट ५ आणि गॅलेक्सी S6 एज प्लससंबंधी सतत माहिती दिली होती. तसेच सॅमसंग गॅलेक्सी S7 दोन आवृत्यांमध्ये उपलब्ध होईल अशीही माहिती मिळतेय.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ईपॉप चिप असू शकते. हा कमी सिग्नल क्षेत्रातही उत्कृष्ट काम करेल. ह्याचा उपयोग पहिल्यांदा गॅलेक्सी S6 आणि S6 एजमध्ये केला गेला होता. काही अन्य लीक्सनुसार ह्या स्मार्टफोनमध्ये २० मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा असू शकतो. त्याशिवाय हा USB टाइप-C आणि अॅप्पलच्या 3D टच वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल.
हल्लीच सॅमसंगने भारतीय बाजारात आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन्स गॅलेक्सी नोट ५ आणि सॅमसंग गॅलेक्सी S6 एज प्लस लाँच केले होते.