सॅमसंगची योजना जानेवारी २०१६ मध्ये गॅलेक्सी S7 लाँच करण्याची होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन जानेवारीएेवजी फेब्रुवारीमध्ये लाँच केला जाईल.
मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करेल. खरे पाहता, सॅमसंग गॅलेक्सी S7 पुढील वर्षी फेब्रुवारीत लाँच केला जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन LTE कॅट १२ व्हर्जन सह लाँच होईल. ह्याआधी मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंगची योजना जानेवारी 2016 मध्ये गॅलेक्सी S7 लाँच करण्याची आहे. मात्र आता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, हा फोन जानेवारीएेवजी फेब्रुवारीमध्ये लाँच केला जाईल. मात्र कंपनीद्वारा ह्या फोनसंबधी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
कंपनी आपल्या ह्या स्मार्टफोनला (गॅलेक्सी S7) दोन व्हर्जनमध्ये लाँच करेल, ज्यात एक क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 चिपसेटवर आधारित आहे. ज्यात दुसरा व्हर्जन सॅमसंगच्या एक्सनोस 8890(M1) प्रोसेसरसह उपलब्ध होईल.
त्याचबरोबर नवीन रिपोर्टनुसार, गॅलेक्सी S7 च्या दोन्ही व्हर्जनमध्ये LTE कॅट. १२ स्पीडचा उपयोग होईल, जो इंटरनेटचा उत्कृष्ट स्पीड देण्यास सक्षम आहे. LTE कॅट. 12 स्पीडच्या माध्यमातून 600BPS च्या गतीने डाऊनलोड आणि 100MBPS च्या गतीने अपलोड करु शकतो.