साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung च्या आगामी Samsung Galaxy S25 सीरीजच्या लाँचची प्रतीक्षा सध्या टेक विश्वात सुरु आहे. ही सिरीज येत्या काही दिवसांत म्हणजेच पुढील वर्षी जानेवारीमध्ये लाँच होऊ शकते. या सिरीजबद्दल अनेक लीक्स पुढे आले आहेत. सध्या, कंपनीने सिरीजच्या लाँच तारखेची पुष्टी केलेली नाही. मात्र, लीक झालेल्या रिपोर्टमध्ये त्याची लाँच डेट समोर आली आहे. लीकवर विश्वास ठेवला तर ही मालिका 22 जानेवारी 2025 रोजी लाँच होईल.
दरम्यान, लाँच डेटनंतर आता सीरिजची सेल डेट देखील लीक झाली आहे. ताज्या लीकनुसार फोनची विक्री साऊथ कोरियामध्ये फेब्रुवारीमध्ये सुरू होईल. एवढेच नाही तर, विक्रीची तारीखही अहवालात समोर आली आहे. जाणून घेऊयात सर्व तपशील-
Also Read: 50MP कॅमेरा आणि Powerful फीचर्ससह नवीनतम Vivo Y29 5G भारतात लाँच, किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी
लोकप्रिय आणि प्रसिद्ध Jukanlosreve नावाच्या टिपस्टरने त्याच्या अधिकृत X हँडलवर Samsung Galaxy S25 सिरीजशी संबंधित काही तपशील उघड केले आहेत. पोस्टनुसार, ही सिरीज दक्षिण कोरियामध्ये 7 फेब्रुवारीला लाँच होणार असून विक्री देखील सुरू होईल. लीकनुसार, Samsung Galaxy S25 सीरीजसाठी 24 जानेवारीपासून प्री-बुकिंग सुरू केली जाऊ शकते, जी 3 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहू शकते.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारात देखील या सिरीजच्या विक्रीची तारीख समान असेल. मात्र, लीक नुसार, 22 जानेवारी 2025 रोजी ग्लोबल ‘Galaxy unpacked’ इव्हेंट आयोजित केला जाऊ शकतो. या इव्हेंटमध्ये कंपनी आपली बहुप्रतिक्षित Samsung Galaxy S25 सीरीज लाँच करेल.
Samsung Galaxy S25 सीरीजचे अनेक स्पेक्स ऑनलाईन लीक झाले आहेत. या सीरीजमध्ये चार फोन Galaxy S25, Galaxy S25 Plus, Galaxy S25 Slim आणि Galaxy S25 Ultra सादर केले जाऊ शकतात. या फोन्सचे स्टोरेज ऑनलाईन उघड झाले आहेत. जसे की, Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोनमध्ये 16GB रॅम आणि 512GB, 1TB स्टोरेज पर्याय असतील. तर, बेस मॉडेल 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येऊ शकते. Galaxy S25 आणि S25+ मध्ये 12GB RAM आणि Samsung Galaxy S24 ला 8GB रॅम मिळेल. ही सिरीज लाँच झाल्यानंतरच कन्फर्म तपशील पुढे येतील. मात्र, त्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत कनेक्टेड राहावे लागेल.