प्रसिद्ध साऊथ कोरियाची स्मार्टफोन निर्माता Samsung ने आपल्या आगामी Samsung Galaxy S25 सिरीजची तयारी सुरु केली आहे. भारतीय मोबाइल वापरकर्ते या नवीन फ्लॅगशिप सिरीजची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. मात्र, आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाची भेट देत कंपनीने Samsung Galaxy S25 लाँचपूर्वी Samsung Galaxy S24 ची किंमत कमी केली आहे. सध्या हा फोन त्याच्या लाँच किमतीपेक्षा 24 हजार रुपयांनी स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध आहे. पाहुयात Samsung Galaxy S24 वरील ऑफर्स-
प्रसिद्ध शॉपिंग साइट Amazon वर सध्या Samsung Galaxy S24 मोठ्या डिस्काउंटसह सूचिबद्ध आहे. या फोनचे 128GB मॉडेल 74,999 रुपयांना लाँच करण्यात आले होते. वर सांगितल्याप्रमाणे, या फोनवर 24 हजार रुपयांची मोठी सूट मिळत आहे. या डिस्काउंटनंतर हा फोन फक्त 50,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. येथून खरेदी करा
एवढेच नाहीत तर, Galaxy S24 फोन 256GB मॉडेल 79,999 रुपयांना लाँच करण्यात आले होते. सध्या Amazon वर 21,000 रुपयांच्या सवलतीसह विकले जात आहे. सध्या Galaxy A24 फक्त 58,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही सवलत तुम्हाला साईटवर थेट मिळत आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Samsung Galaxy S24 स्मार्टफोन 6.2-इंच लांबीच्या FHD+ डिस्प्लेवर लॉन्च करण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटवर कार्य करतो. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंग, हा फोन सॅमसंगच्या Exynos 2400 deca-core प्रोसेसरसह प्रदान करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोनसोबत 7 वर्षांचे Android OS अपडेट देखील उपलब्ध असेल.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Galaxy S24 ट्रिपल रिअर कॅमेराला सपोर्ट करतो. फोनच्या मागील पॅनलवर फ्लॅश लाइटसह सुसज्ज 50MP चा मुख्य सेन्सर, 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 3x ऑप्टिकल झूम क्षमतेसह 10MP टेलीफोटो लेन्ससह प्रदान केला आहे. फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे, जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 4,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी जलद चार्जिंग तंत्रज्ञान आणि वायरलेस चार्जिंगसह येते.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.