Samsung Galaxy S24 सीरीजची सेल अखेर सुरू झाली आहे. या सिरीज अंतगर्त Galaxy S24 Ultra, Galaxy S24 Plus आणि Galaxy S24 हे स्मार्टफोन्स खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे भारतात विकली जाणारी Galaxy S24 सिरीज मेड इन इंडिया आहे. म्हणजे हे स्मार्टफोन्स भारतातच बनवले गेले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनच्या पहिल्या सेलमध्ये तुम्हाला 12,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. त्याबरोबरच, तुम्ही फोन विकत घेतल्यास, तुम्हाला 24 महिन्यांच्या EMI वर 10,000 रुपयांची सूट मिळेल. तुम्ही SAMSUNG च्या अधिकृत साईटवर जाऊन या ऑफर्सचा सवसितर तपशील बघू शकता. बघुयात लेटेस्ट सिरीजचे स्पेसिफिकेशन्स-
बहुचर्चित Samsung Galaxy S24 सिरीजमध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये लाईव्ह ट्रान्सलेशन, चॅट असिस्टंट, नोट असिस्टंट, ट्रान्सक्रिप्ट असिस्ट सारखी फीचर्स फोनमध्ये उपलब्ध आहेत. तसेच, इन-बिल्ड AI फीचर्स देण्यात आले आहेत, जे 14 भाषांना रिअल-टाइम सपोर्ट देते. त्यात हिंदीसह अनेक भाषांचा सपोर्ट देण्यात घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, Android Auto आपोआप येणाऱ्या मॅसेजेसची देते. तसेच, त्याला आवश्यक रिप्लाय देखील देतो.
Galaxy S24 सिरीज पहिला फोन आहे, ज्यामध्ये सर्कल टू सर्च, हायलाइट असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये AI जनरेट सर्च ऑप्शन उपलब्ध आहेत. Galaxy S24 सिरीजमध्ये प्रो व्हिज्युअल इंजिन दिले गेले आहे, जे AI जनरेट केलेले साधन आहे. Galaxy S24 Ultra स्मार्टफोन 5x ऑप्टिकल झूमसह येतो, यात 100X डिजिटल झूम आहे.
Samsung Galaxy S24 फोनची किंमत $799 म्हणजेच अंदाजे 66,500 रुपयांपासून सुरू होते. तर, त्याचे 256GB मॉडेल $859 म्हणजेच अंदाजे 71,436 रुपयांमध्ये येईल. Samsung Galaxy S24 Plus फोनमध्ये $999 म्हणजेच अंदाजे 83,000 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. तर, Samsung Galaxy S24 Ultra ची जागतिक किंमत $1299 म्हणजेच अंदाजे 1,08,000 रुपयांपासून सुरू होते.