Samsung ची आश्चर्यकारक डील! Latest Galaxy S24 च्या प्री-बुकिंगवर हजारो रुपयांची मोठी सूट। Tech News 

Samsung ची आश्चर्यकारक डील! Latest Galaxy S24 च्या प्री-बुकिंगवर हजारो रुपयांची मोठी सूट। Tech News 
HIGHLIGHTS

लेटेस्ट स्मार्टफोन सीरीज Samsung Galaxy S24 चे प्री-बुकिंग लाईव्ह

फोनचे प्री-बुकिंग केल्यास तुम्हाला 20 हजार रुपयांपर्यंतचे फायदे

बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास 10,000 रुपयांची सूट

Samsung ने नुकतेच आपली नवीनतम Galaxy S24 सिरीज लाँच केली आहे. दरम्यान, कंपनीने आता नवीन लाँच केलेल्या स्मार्टफोन सीरीज Galaxy S24 चे प्री-बुकिंग लाईव्ह केले आहे. हा फोन फ्लिपकार्ट डेज सेलमध्ये प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनचे प्री-बुकिंग केल्यास तुम्हाला 20 हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात. Samsung Galaxy S24 सीरीज अंतर्गत तीन स्मार्टफोन Galaxy S24, Galaxy S24 plus आणि Galaxy S24 Ultra लाँच करण्यात आले आहेत. फोनमध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे याला Galaxy AI म्हटले जात आहे. बघुयात सविस्तर-

Samsung Galaxy S24 सीरीज प्री-बुकिंग डिटेल्स

Samsung Galaxy S24 फोनची प्री-बुकिंग केल्यास तुम्हाला अनेक बेनिफिट्स मिळणार आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या कार्डवर कमाल 5000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. तसेच, 5000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तसेच, 9 महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI सुविधा दिली जात आहे. इतर बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, 5000 रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. याद्वारे तुम्ही Samsung Galaxy S24 सीरीजवर तुम्ही हजारो रुपयांची सूट मिळवू शकता.

Samsung Galaxy S24 Ultra 5G AI camera
#image_title

Samsung Galaxy S24 चे तपशील

या फोनमध्ये 6.2 इंच लांबीचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले मिळेल. हा फोन Snapdragon 8 Gen 3 किंवा Exynos 2400 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर, 10MP टेलिफोटो सेन्सर आणि 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी आहे.

Samsung Galaxy S24 Ultra चे तपशील

या फोनमध्ये 6.8 इंच लांबीचा क्वाड डिस्प्ले आहे. फोनमध्ये 200MP मुख्य कॅमेरा सेन्सर आहे. फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर सपोर्टसह येईल. याशिवाय, 50MP अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, 12MP टेलिफोटो लेन्स आणि 10MP लेन्स देखील आहे. फोनमध्ये समोर 12MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo