गेल्या अनेक दिवसांपासून Samsung च्या लेटेस्ट सिरीजची प्रतीक्षा टेक विश्वात सर्वत्र होती. मात्र, अखेर Samsung Galaxy S24 5G सिरीज Samsung Galaxy Unpacked 2024 इव्हेंट दरम्यान लाँच झाली आहे. कंपनीने या सीरीज अंतर्गत Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra हे तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. लेटेस्ट फ्लॅगशिप सीरीजबद्दल बोलायचे झाले तर या सीरीजचे फोन अनेक AI फीचर्सने सुसज्ज आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता Samsung Galaxy S24 सिरीजची किंमत आणि संपूर्ण तपशील जाणून घेऊयात.
हे सुद्धा वाचा: Amazon ग्रेट रिपब्लिक डे Sale मध्ये Samsung च्या स्मार्टफोन्सवर बंपर Discount, जाणून घ्या Best ऑफर
Samsung Galaxy S24 फोनची किंमत $799 म्हणजेच अंदाजे 66,500 रुपयांपासून सुरू होते. तर, त्याचे 256GB मॉडेल $859 म्हणजेच अंदाजे 71,436 रुपये मध्ये ऑफर केले गेले आहे. या फोनमध्ये यलो, पर्पल, ग्रे, ब्लॅक, ग्रीन, सॅफायर ब्लू आणि ऑरेंज कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
या फोनमध्ये 6.2 इंच लांबीचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 3 किंवा Exynos 2400 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासोबतच, फोनमध्ये 8GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर, 10MP टेलिफोटो सेन्सर आणि 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी 4000mAh आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.
Samsung Galaxy S24 Plus फोनमध्ये $999 म्हणजेच अंदाजे 83,000 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. यामध्ये ग्रीन, सफायर ब्लू आणि ऑरेंज कलर ऑप्शन्स मिळणार आहेत. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy S24+ फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा QHD+ डिस्प्ले आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 3 किंवा Exynos 2400 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
त्याबरोबरच, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 12GB रॅमचे पर्याय उपलब्ध आहेत. फोनचे स्टोरेज 512GB पर्यंत आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देखील आहे. या फोनची बॅटरी 4,900mAh आहे, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
Samsung Galaxy S24 Ultra ची जागतिक किंमत $1299 म्हणजेच अंदाजे 1,08,000 रुपयांपासून सुरू होते. या फोनमध्ये 12GB रॅम आहे. तर स्टोरेजच्या बाबतीत, 256GB, 512GB आणि 1TB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. तसेच, या फोनसह Titanium Yellow, Titanium Black, Titanium Grey आणि Titanium Purple कलर ऑप्शन्स सादर करण्यात आले आहेत.
Samsung Galaxy S24 Ultra फोनमध्ये 6.8-इंच लांबीचा QHD+ डायनॅमिक AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर, हा फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. विशेष म्हणजे परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये अनेक AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy S24 Ultra 5G फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर, 5X झूमसह 50MP टेलिफोटो सेन्सर, 3X झूमसह 10MP टेलिफोटो सेन्सर आणि यात 12MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.