तारीख नोट करा! Samsung Galaxy S24 सिरीजची लाँच तारीख उघड, प्री-ऑर्डर आणि सेल डेट देखील जाहीर। Tech News
Samsung Galaxy S23 लाँच होताच अधिक आकर्षक आणि लोकप्रिय सिरीज बनली होती.
Samsung Galaxy S24 सिरीज 17 जानेवारी 2024 रोजी लाँच केली जाऊ शकते.
प्री-ऑर्डर देखील स्मार्टफोनच्या लाँचसह सुरू केली जाऊ शकते.
Samsung ची फ्लॅगशिप S24 सिरीज नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2024 मध्ये प्रवेश करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra असे तीन मॉडेल सादर केले जाणार आहेत. अलीकडेच पुढे आलेल्या अहवालानुसार, हे सर्व 17 जानेवारी रोजी टेक प्लॅटफॉर्मवर सादर केले जातील.
हे सुद्धा वाचा: 108MP मेन कॅमेरासह Redmi Note 13R Pro 5G टेक विश्वात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News
आम्ही तुम्हाला सांगतो की, ही माहिती ब्रँड अधिकाऱ्याने शेअर केल्यामुळे अचूक मानली जात आहे. यासोबतच स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डर आणि सेलची डेटही समोर आली आहे. लक्षात घ्या की, Samsung Galaxy S23 लाँच होताच अधिक आकर्षक आणि लोकप्रिय सिरीज बनली होती.
Samsung Galaxy S24 सिरीजची लाँच तारीख
Samsung Galaxy S24 सिरीज 17 जानेवारी 2024 रोजी लाँच केली जाऊ शकते. प्री-ऑर्डर देखील स्मार्टफोनच्या लाँचसह सुरू केली जाऊ शकते. अहवालात असे समोर आले आहे की, जे वापरकर्ते फोनची प्री-ऑर्डर करतात त्यांना 26 ते 30 जानेवारी 2024 पर्यंत फोन हातात मिळालाय सुरु होईल. त्याबरोबरच, Galaxy S24 सिरीजची खुली विक्री 30 जानेवारीपासून सुरू होऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सीरिजच्या लाँचबाबत अद्याप अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही.
Samsung Galaxy S24 चे लीक स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S24 सिरीजमध्ये 6.1-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले असू शकतो. तर, Galaxy S24 Plus मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. टॉप मॉडेल अल्ट्रामध्ये 6.8-इंच लांबीचा AMOLED WQHD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट असण्याची अपेक्षा आहे. तिन्ही मॉडेल्स Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर सह Adreno GPU ने सुसज्ज असल्याचे सांगितले जाते. तथापि, अनेक देशांमध्ये, मोबाईल Exynos 2400 चिपसेटसह देखील येऊ शकतात.
Samsung Galaxy S24 Ultra मध्ये 12MP आणि 10MP लेन्स + 3x झूमसह 200MP प्रायमरी कॅमेरासह क्वाड कॅमेरा सेटअपसह सुसज्ज असू शकतो. तर इतर दोन फोनमध्ये 50MP प्रायमरी लेन्ससह 10MP आणि 2MP सेंसर प्रदान केले जाऊ शकतात. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह प्रदान केली जाऊ शकते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile