Google Pixel 8 आणि Google Pixel 8 Pro युजर्ससाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. या सिरीजला लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S24 Series चे AI फीचर मिळेल. Samsung Galaxy Unpacked कार्यक्रम 17 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कंपनीने Galaxy S24 सीरीजसोबत Galaxy AI लाँच केला आहे. याशिवाय, गॅलेक्सी रिंगही टीज करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण Galaxy AI होते.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Google च्या सहकार्याने अनेक नवीन AI फीचर्सची घोषणा केली. ‘सर्कल टू सर्च’ हे AI फिचर आहे, जे डिस्प्लेवर सर्च करणे सोपे करते. Google ने पुष्टी केली आहे की, हे फिचर Google Pixel 8 सिरीजमध्ये देखील आणले जाईल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Google ने आपल्या अधिकृत X म्हणजेच Twitter अकाऊंटवरून ट्विट केले आहे की, Samsung Galaxy S24 Series नंतर सर्कल टू सर्च फीचर Google Pixel 8 Series मध्ये देखील उपलब्ध होईल. हे फिचर Pixel 8 सीरीजसाठी महिन्याच्या शेवटी 31 जानेवारी रोजी लाँच केले जाईल.
Google ने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘सर्कल टू सर्च’ हे App न बदलता काहीही शोधण्याचा एक नवीन मार्ग आहे. फक्त फोटो, टेक्स्ट किंवा विडिओभोवती फक्त एक वर्तुळ म्हणजेच सर्कल काढा आणि Google AI ते तुमच्यासाठी सर्च करेल. Google चे म्हणणे आहे की, हे फिचर इतर ‘निवडक प्रीमियम Android स्मार्टफोन्स’ मध्ये देखील येईल. मात्र, कोणत्या स्मार्टफोनमध्ये हे AI फीचर असेल हे अद्याप पुढे आलेले नाही.
सर्कल टू सर्च हे AI फीचर आहे. Google Lens वापरण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. तुमचे आवडते Apps वापरताना तुम्ही जे पाहता ते सर्च करणे तुमच्यासाठी सोयीस्कर आणि जलद बनवणे हा या फीचरचा उद्देश आहे. Samsung Galaxy S24 सिरीजवर Circle to Search वापरण्यासाठी, तुम्हाला फक्त होम बटण किंवा नेव्हिगेशन बार दाबून ठेवावे लागेल. पुढे, आपण शोधू इच्छित असलेल्या ऑब्जेक्टवर वर्तुळ काढा. हे ऑब्जेक्ट फोटो किंवा Video मध्ये असू शकते. सर्कल टू सर्च फिचर दोन्हीसाठी कार्य करेल.