Samsung ने मागील वर्षी लाँच केलेल्या Galaxy S23 सिरीजने बाजारात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर, आता Samsung Galaxy S24 सिरीजची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. या सीरीज अंतर्गत, कंपनी तीन स्मार्टफोन सादर करणार आहे. Samsung Galaxy S24, Galaxy S24+ आणि Galaxy S24 Ultra स्मार्टफोन्सचा यात समावेश असेल.
आगामी सिराजच्या लॉन्चिंगबद्दल बोलायचे झाल्यास, लीक रिपोर्ट्समध्ये स्मार्टफोन्सचे खास स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. तसेच, अहवालानुसार ही सिरीज 17 जानेवारी 2024 रोजी रात्री 11:30 वाजता भारतीय वेळेनुसार लाँच केली जाईल. लक्षात घ्या की, कंपनीने अद्याप अधिकृत लाँच डेट जाहीर केलेली नाही.
हे सुद्धा वाचा: POCO X6 सिरीज ‘या’ दिवशी होणार भारतात लाँच, तुमच्यासाठी Affordable असणार की नाही? Tech News
ताज्या अहवालानुसार, Samsung Galaxy S24+ SM-S926U या मॉडेल क्रमांकासह Walmart वर सूचीबद्ध झाला. यामध्ये फोनचे खास फीचर्स, डिझाईन आणि AI क्षमतांची माहिती देण्यात आली आहे. त्याबरोबरच, आणखी एका लीकमध्ये सिरीजचे प्री-ऑर्डर डिटेल्सही समोर आले आहेत.
एका साऊथ कोरियन प्रकाशनाच्या मते, Samsung सिरीज प्री-ऑर्डर करणार्या वापरकर्त्यांना मोफत स्टोरेज अपग्रेड देऊ शकते. तसेच, ऑफर्ससह Galaxy इयरबड्स आणि स्मार्टवॉच मिळण्याची देखील शक्यता आहे. मात्र, सर्व बेनिफिट्स लॉंचिंग दरम्यानच येतील.
वर सांगितल्याप्रमाणे, फोनमध्ये खास AI फीचर्स असण्याचीही अपेक्षा आहे. सॅमसंग गॅलरी App मधील फोटो एडिटर युजरला फोटोवरील वस्तू एडिट आणि रिमूव्ह करण्याची अनुमती देतो. याशिवाय लाइव्ह ट्रान्सलेट फीचरही स्मार्टफोनमध्ये मिळेल. ज्याद्वारे तुम्ही रिअल टाइममध्ये भाषांतर करण्यास सक्षम असाल. एवढेच नाही तर, आगामी सिरीज Galaxy AI तंत्रज्ञानासह येईल. यात ChatGPT सारखी जनरेटिव्ह टेक्स्ट क्षमता समाविष्ट आहे. हे सॅमसंगच्या गॉस लार्ज लँग्वेज मॉडेलद्वारे समर्थित असेल.
लिस्टिंगनुसार, Galaxy S24+ स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल. लीक झालेल्या मॉडेलमध्ये 12GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज आहे. फोनचा Onyx ब्लॅक कलर पर्याय सूचीबद्ध आहे. फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटच्या पुढील बाजूस 12MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. वापरकर्त्यांना यासह पूर्ण 50MP मोड आणि नायटोग्राफी झूम पर्याय मिळण्याची अपेक्षा आहे.