Samsung Galaxy S24 FE फोन सर्वोत्तम कॅमेरासह होणार दाखल, लाँचपूर्वीच सर्व फीचर्स लीक

Samsung Galaxy S24 FE फोन सर्वोत्तम कॅमेरासह होणार दाखल, लाँचपूर्वीच सर्व फीचर्स लीक
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S24 FE चे सर्व तपशील लाँचपूर्वी लीक

Samsung Galaxy S24 FE मध्ये Galaxy S24, S23 आणि S23 FE सारखाच प्राथमिक कॅमेरा असू शकतो.

Samsung Galaxy S24 FE नवीनतम फोन जुन्या मॉडेलचे अपग्रेड वर्जन असेल.

Samsung Galaxy S24 FE: Samsung च्या नवीन फॅन एडिशन मोबाईल Samsung Galaxy S24 FE बाबत चर्चा सध्या टेक विश्वात सुरु आहे. आगामी स्मार्टफोनबाबत आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. नवीनतम फोन जुन्या मॉडेलचे अपग्रेड वर्जन असेल, असे सांगण्यात आले आहे. हे उपकरण वर्षाच्या अखेरीस बाजारात येण्याची शक्यता आहे. ब्रँडची घोषणा अद्याप प्रतीक्षेत असली तरी, नवीन लीकमध्ये कॅमेऱ्याबद्दल काही तपशील नमूद केले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात लीक्स-

Also Read: बहुप्रतीक्षित Xiaomi 14 Civi भारतात शानदार फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व तपशील

Samsung Galaxy S24 FE लीक कॅमेरा तपशील

Samsung च्या आगामी Samsung Galaxy S24 FE मध्ये Galaxy S24, S23 आणि S23 FE सारखाच प्राथमिक कॅमेरा असू शकतो, असा दावा Galaxy Club अहवालात केला जात आहे. लीकनुसार, यात 50MP ISOCELL GN3 आणि 1.0μm पिक्सेलसह 1/1.57 सेन्सर आकाराची अपेक्षा आहे. नवीन अहवालात केवळ प्रायमरी सेन्सरची माहिती देण्यात आली आहे. तर, वर नमूद केलेल्या लेन्ससह, 8MP टेलिफोटो आणि 12MP अल्ट्रा वाइड लेन्स स्थापित केले जाऊ शकतात, असा देखील अंदाज वर्तवला जात आहे.

Samsung Galaxy S24 FE

एवढेच नाही तर, वापरकर्त्यांना Samsung Galaxy S24 FE स्मार्टफोनमध्ये 6.1 इंच लांबीचा मोठा डिस्प्ले मिळण्याची अपेक्षा आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 चिपसेट वापरू शकतो. तर भारतात येणाऱ्या मॉडेलमध्ये Exynos 2400 चिपसेट बसवला जाऊ शकतो. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. स्टोरेजच्या बाबतीत, डिव्हाइस 12GB LPDDR5X रॅम आणि 256GB UFS 4.0 अंतर्गत मेमरीसह येऊ शकतो.

Samsung Galaxy S23 FE

Samsung Galaxy S23 FE च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 6.4 इंच लांबीचा 120Hz AMOLED डिस्प्ले आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी हा डिवाइस Exynos 2200 प्रोसेसर सह येतो. फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, फोनमध्ये समोर 10MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झल्यास, यात 4500mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo