digit zero1 awards

Samsung Galaxy S23 Ultra vs iPhone 14 Pro Max: Apple आणि Samsung मध्ये सर्वोत्कृष्ट कोण?

Samsung Galaxy S23 Ultra vs iPhone 14 Pro Max: Apple आणि Samsung मध्ये सर्वोत्कृष्ट कोण?
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S23 Ultra ची स्पर्धा iPhone 14 Pro Max सह होते.

दोन्ही स्मार्टफोनची किंमत 1 लाख रुपयांच्या वर

जाणून घेऊयात दोन्ही फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्समधील फरक

Samsungने अलीकडेच आपला सर्वात पावरफुल स्मार्टफोन Samsung Galaxy S23 Ultra लाँच केला आहे. दक्षिण कोरियाच्या कंपनीने 2023 मध्ये लॉन्च केलेले हे सर्वात प्रीमियम डिव्हाइस आहे. या डिव्हाईसची थेट स्पर्धा iPhone 14 Pro Max सह होते. चला तर मग बघुयात Galaxy S23 Ultra आणि iPhone 14 Pro Max मध्ये काय फरक आहे? बघा फीचर्स… 

हे सुद्धा वाचा : Valentines Day होईल खास! पार्टनरला गिफ्ट करा iPhone 14, येथे अप्रतिम ऑफर सुरु

डिस्प्ले : 

 Galaxy S23 Ultra स्मार्टफोन Apple iPhone 14 Pro Max पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. Galaxy S23 अल्ट्रा कर्व डिस्प्ले आणि बॉक्सी डिझाइनसह येतो. तर , iPhone 14 Pro Max स्मार्टफोन फ्लॅट डिस्प्ले आणि कर्व एजसह येतो. Galaxy S23 Ultra मध्ये 6.8-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे तर iPhone 14 Pro Max मध्ये 6.7-इंचाचा XDR OLED स्क्रीन आहे. S23 Ultra मध्ये एक छोटा Infinity O नॉच देण्यात आला आहे, तर यावेळी Apple ने iPhone 14 सीरीजमध्ये Dynamic Island फीचर दिले आहे.

बॅटरी : 

Apple सहसा iPhone 14 Pro Max ची बॅटरी क्षमता उघड करत नाही. पण यात 4323mAh बॅटरी असू शकते. तर, Galaxy S23 Ultra ला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

परफॉर्मन्स : 

नवीनतम Galaxy S23 Ultra ला Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 2 चिपसेटची कस्टमाइज्ड आवृत्ती देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. 

त्याबरोबरच, iPhone 14 Pro Max मध्ये Appleचा A16 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 1TB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध आहे.

Apple चा नवीनतम चिपसेट CPU कामगिरीच्या बाबतीत खूप पुढे जातो. तथापि, GPU कामगिरीच्या बाबतीत, Snapdragon 8 Gen 2 चिपसेट AnTuTu वर Apple A16 Bionic ला मागे टाकतो.

कॅमेरा : 

Galaxy S23 Ultra आणि iPhone 14 Pro Max ची कॅमेरा सिस्टम यावेळी अपग्रेड करण्यात आली आहे. iPhone 14 Pro Max मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी, 12 मेगापिक्सल टेलिफोटो आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्राव्हायोलेट सेन्सर आहेत. 

 Galaxy S23 Ultra मध्ये Samsung चा 200MP ISOCELL HP2 सेन्सर आहे, जो 12-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 10-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्ससह येतो. टेलीफोटो लेन्स 3x आणि 10x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो.

iPhone 14 Pro Max च्या तुलनेत, Galaxy S23 Ultra चा कॅमेरा नक्कीच मजबूत दिसतो. मात्र, प्रत्यक्षात फोटोजची कॉलिटी वेगळी आहे. 

किंमत : 

Galaxy S23 Ultra ची भारतात किंमत रु.1,24,999 पासून सुरू होते. दरम्यान, iPhone 14 Pro Max च्या बेस व्हेरिएंटची देशात किंमत 1,39,900 रुपये आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo