साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung या महिन्यात आपली आगामी Samsung Galaxy S25 सीरीज लाँच करणार आहे. अनेक लीकनुसार, या लाइनअपचे अनावरण येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे. नव्या सिरीजच्या लाँचपूर्वी, कंपनीने जुने मॉडेल Samsung Galaxy S23 Ultra 5G च्या किमतीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन Amazon वर त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. Amazon रिपब्लिक डे सेलमध्ये हा फोन भारी सवलतींसह ऑफर केला जात आहे. ही सेल सध्या प्राईम मेम्बर्ससाठी सुरु असून आज दुपारी 12 वाजतापासून सर्व मेम्बर्ससाठी लाईव्ह झाली आहे. जर तुम्हाला कमी किमतीत भारी फ्लॅगशिप फोन हवा असेल तर, Samsung Galaxy S23 Ultra वरील ऑफर्स पहा-
लोकप्रिय Samsung Galaxy S23 Ultra च्या 12GB+ 256GB वेरिएंटची किंमत 1.49 लाख रुपये इतकी आहे. मात्र, Amazon वर ते हा फोन 71,999 मध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 2000 रुपयांची सवलत दिली जात आहे. सवलतीसोबतच त्यावर नो-कॉस्ट EMI आणि अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. Amazon वर ही फ्लॅगशिप सिरीज एक्सचेंज ऑफरद्वारे खरेदी केले जाऊ शकते. अधिक माहिती आणि खरेदीसाठी येथे क्लिक करा.
Samsung Galaxy S23 Ultra फोन AMOLED डिस्प्लेसह येतो, जो 120Hz ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेट प्रदान करण्यात आला आहे. Snapdragon 8 Gen 2 मध्ये प्रगत AI फीचर्स आहेत, जी कॅमेरा कार्यक्षमता आणि मशीन लर्निंग सारखी टास्क एन्हान्स करतात. त्यात चेहरा ओळखण्यासाठी AI सह ऑल्वेज सेन्सिंग कॅमेरा देखील आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 12GB+ 256GB आणि 12GB+ 512GB स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy S23 Ultra फोन क्वाड कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. यात 200MP मुख्य लेन्स, 10MP टेलिफोटो लेन्स, 10MP पेरिस्कोप कॅमेरा आणि 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. लाँच होताबरोबरच, या फोनच्या कॅमेराचे खूप कौतुक झाले होते. या कॅमेरा सेटअपमुळे हा फोन आजही इतर कंपन्यांच्या अनेक फ्लॅगशिप मॉडेल्सना जोरदार टक्कर देतो.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.