Samsung Galaxy S23 सिरीज 1 फेब्रुवारी रोजी Galaxy Unpacked कार्यक्रमादरम्यान लॉन्च होणार आहे. Samsung Galaxy S23, Samsung Galaxy S23+ आणि Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोन या सिरीजमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. अधिकृत लॉन्चच्या काही दिवस आधी, आता या सिरीजची किंमत आणि स्पेसिफिकेशनचे तपशील समोर आले आहेत.
हे सुद्धा वाचा : डेली 4GB डेटासह येतो 'हा' Vodafone Idea प्लॅन, किंमत 500 रुपयांपेक्षा कमी
रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S23 फोनमध्ये 6.1-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल. S23 Plus वेरिएंटमध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. दोन्ही उपकरणांचे डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह FHD+ रिझोल्यूशनसह येतील. तसेच, दोन्ही उपकरणांना HDR10+ सपोर्ट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षण मिळेल.
Galaxy S23 ला 3900mAh ची बॅटरी मिळेल आणि S23+ ला 4700mAh चा मोठा बॅटरी पॅक मिळेल. दोन्ही फोन 25W चार्जिंग सपोर्टसह येतील. अल्ट्रा फोनची बॅटरी 5000mAh असेल, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. ऍप्पलसारखे सॅटेलाइट कम्युनिकेशन फीचर देखील या फोनमध्ये उपलब्ध होणार आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या पुढील बाजूस 12MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. 50M मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 10MP टेलिफोटो लेन्स स्मार्टफोनच्या मागील बाजूस मिळू शकतात. सिरीजमधील प्रीमियम फोन Galaxy S23 Ultra मध्ये 200MP मुख्य कॅमेरा मिळू शकतो.
एका ताज्या रिपोर्टमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये Samsung Galaxy S23 स्मार्टफोनची किंमत $1,350 (सुमारे 77,140 रुपये) असेल अशी माहिती देण्यात आली आहे. तर, Samsung Galaxy S23 + फोन $ 1,650 (सुमारे 94,280 रुपये) मध्ये ऑफर केला जाईल. Samsung Galaxy S23 Ultra हे या सिरीजमधील सर्वात प्रीमियम डिव्हाइस असेल, ज्याची किंमत $1,950 (अंदाजे रु. 1.11 लाख) आहे. या सर्व किंमती डिव्हाइसच्या बेस व्हेरिएंटच्या असतील.