Samsung Galaxy S23 सिरीजची प्री-बुकिंग सुरू, ग्राहकांना मिळणार 5,000 रुपयांचे फायदे

Samsung Galaxy S23 सिरीजची प्री-बुकिंग सुरू, ग्राहकांना मिळणार 5,000 रुपयांचे फायदे
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S23 सिरीजची प्री-बुकिंग सुरू झाली आहे.

कंपनीच्या अधिकृत साइटवरून प्री-बुकिंग केली जाऊ शकते.

हे सिरीज 1 फेब्रुवारी 2023 रोजी लाँच होणार आहे.

हँडसेट निर्माता Samsung पुढील महिन्यात भारतीय बाजारपेठेत आपली फ्लॅगशिप Samsung Galaxy S23 सीरीज लॉन्च करणार आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी लाँच होणाऱ्या या सिरीजसाठी प्री-बुकिंग सुरू केली आहे. जर तुम्हाला ही आगामी फ्लॅगशिप सिरीज खरेदी करण्यात रस असेल तर तुम्ही Samsung Galaxy S23 सिरीजसाठी प्री-बुकिंग करू शकता.

हे सुद्धा वाचा : iQoo 11 5G नवीन स्मार्टफोनची सेल सुरू, मिळतेय तब्बल 9000 रुपयांची सवलत

Samsung Galaxy S23 सिरीज प्री बुकिंग 

Galaxy S23 व्यतिरिक्त, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra सॅमसंगच्या या फ्लॅगशिप सीरीज अंतर्गत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. सॅमसंगची ही आगामी सीरीज कंपनीच्या अधिकृत साइटवरून प्री-बुकिंग केली जाऊ शकते.

पुढील महिन्यात लॉन्च होणार्‍या Samsung Galaxy S23 सीरीजचे प्री-बुकिंग करणार्‍यांना कंपनीकडून प्री-बुकिंग ऑफर देखील मिळतील. सॅमसंगच्या अधिकृत साइट Samsung.com वर दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे की, जे यूजर्स सॅमसंगच्या या फ्लॅगशिप सीरीजचे प्री-बुकिंग करतील त्यांना कंपनीकडून 5,000 रुपयांचे फायदे दिले जातील. सिरीजचे प्री-बुकिंग करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना 1,999 रुपये भरावे लागतील.

प्री-बुकिंग करणार्‍या ग्राहकांना हे उपकरण लवकर डिलिव्हरी करण्याव्यतिरिक्त, तुम्हाला तुमचा Galaxy स्मार्टफोन एक्सक्लुसिव्ह कलर्समध्ये मिळेल. एवढेच नाही, तर ग्राहकांना कंपनीकडून 2,000 रुपयांचे वेलकम व्हाउचर देखील दिले जाईल आणि सॅमसंग शॉप ऍप द्वारे बुकिंग केल्यावर 2 टक्के लॉयल्टी पॉइंट्स देखील मिळतील.

स्पेसिफिकेशन्स : 

सॅमसंगच्या अधिकृत साइटवर या फ्लॅगशिप सीरिजसाठी एक स्वतंत्र पेज तयार करण्यात आले आहे, जिथे केवळ प्री-बुकिंग फायदेच नाही तर या आगामी सीरिजमधी काही खास फीचर्सही पुष्टी करण्यात आली आहे. या सिरीजसह, वापरकर्त्यांना उत्कृष्ट झूम क्षमतेसह नाईट फोटोग्राफीचा उत्कृष्ट अनुभव दिला जाईल. कंपनीने Samsung Galaxy S22 Ultra मध्ये 100x झूम फीचर दिले आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo