Samsung ची उपकरणे भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये Samsung ने Samsung Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra स्मार्टफोन लाँच केले होते. Samsung ने नुकतेच Galaxy S23 भारतात एका नवीन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. नव्या व्हेरिएंटची किंमत, फीचर्स, स्पेक्स आणि ऑफर्स बघुयात-
Samsung Galaxy S23 चा लाईम कलर व्हेरिएंट 16 मे 2023 पासून देशात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट 74,999 रुपयांना खरेदी करता येईल. तर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 79,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. नवीन लाइम कलरसोबतच सॅमसंगने फोनच्या खरेदीवर काही नवीन ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
कंपनी HDFC क्रेडिट कार्ड आणि बजाज फिनसर्व्ह कार्ड व्यवहारांवर 24 महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI ऑफर देत आहे. तर एक्सचेंज ऑफरअंतर्गत 8,000 रुपयांपर्यंतचा अपग्रेड बोनस मिळेल. फोनवर 5000 रुपयांची कॅशबॅक ऑफर देखील मिळणार आहे. याद्वारे तुम्हाला फोनवर 13 हजार रुपयांची सूट मिळणार आहे.
Samsung Galaxy S23 च्या नव्या कलर व्हेरिएंटचे फीचर्स आणि स्पेक्स ओरिजनल व्हेरिएंटसारखेच आहेत. यामध्ये 6.1 इंच लांबीचा फुल HD + 120Hz डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले मिळेल, जो HDR सपोर्टसह येतो. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आहे.
त्याबरोबरच, यात 3900mAh बॅटरी देण्यात आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy S23मध्ये 50 मेगापिक्सेल प्राइमरी, 12 मेगापिक्सल आणि 10 मेगापिक्सेलसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 12 मेगापिक्सेल ड्युअल पिक्सेल सेन्सर आहे.