Good News! लोकप्रिय Samsung Galaxy S23 FE फोन तब्बल 10,000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News

Updated on 26-Apr-2024
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे.

Samsung Galaxy S23 FE फोन 10,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

फोनच्या नव्या किमती कंपनीच्या अधिकृत साईटवर लाईव्ह

Samsung चा लोकप्रिय मिड बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy S23 FE फोन स्वस्त झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, यावर दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. याआधी फेब्रुवारीमध्येही एकदा या फोनची किंमत कमी करण्यात आली होती. हा फोन Exynos 220 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोनची नवी किंमत-

हे सुद्धा वाचा: भारीच की! HMD ची पहिली स्मार्टफोन सीरीज लाँच, 50MP फ्रंट कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स। Tech News

Samsung Galaxy S23 FE

Samsung Galaxy S23 FE ची नवी किंमत

कंपनीने Samsung Galaxy S23 FE फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या फोनच्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 59,999 रुपये होती. तर, 256GB स्टोरेज वेरिएंट 69,999 रुपयांना सादर करण्यात आला होता.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या किंमतीतील कपातीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची किंमत 5000 रुपयांनी कमी करण्यात आली होती. यासह फोनचा 128GB स्टोरेज वेरिएंट 54,999 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच, 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 64,999 रुपये करण्यात आली आहे.

त्यानंतर, Samsung Galaxy S23 FE च्या किमतीत परत एकदा कपात करण्यात आली आहे. आता तुम्ही 128GB स्टोरेज व्हेरिएंट 49,999 रुपयांना खरेदी करू शकता. मात्र ही कपात लिमिटेड टाइम करता आहे, असे कंपनीच्या साईटवरून समजते. तर, 256GB स्टोरेज मॉडेल 10,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. कपातीनंतर हा फोन तुम्ही 54,999 रुपयांना खरेदी करू शकता. फोनच्या नव्या किमती कंपनीच्या अधिकृत साईटवर लाईव्ह आहेत.

Samsung Galaxy S23 FE चे फीचर्स आणि स्पेक्स

Samsung Galaxy S23 FE फोनमध्ये 6.4 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. सुरळीत कामकाजासाठी हा फोन Exynos 220 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 8MP ऑप्टिकल झूम आहे, जो OIS समर्थनासह येते. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :