Price Cut! लोकप्रिय Samsung Galaxy S23 FE वर तब्बल 23,000 रुपयांची कपात, स्वस्तात मिळतील फ्लॅगशिप फीचर्स

Price Cut! लोकप्रिय Samsung Galaxy S23 FE वर तब्बल 23,000 रुपयांची कपात, स्वस्तात मिळतील फ्लॅगशिप फीचर्स
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S23 FE फोनच्या किमतीत प्रचंड मोठी कपात

Samsung Galaxy S23 FE 5G फोन तब्बल 23,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

Samsung Galaxy S23 FE 5G ची नवी किंमत कंपनीच्या अधिकृत साईटवर लाईव्ह

Samsung ने गेल्या वर्षी भारतात Samsung Galaxy S23 FE हा हाय बजेट स्मार्टफोन लाँच केला. हा स्मार्टफोन Samsung च्या लोकप्रिय सिरीजमधील स्मार्टफोन आहे. तुम्ही देखील हा महागडा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक उत्तम बातमी पुढे आली आहे. आता Samsung Galaxy S23 FE 5G फोन तब्बल 23,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. या फोनच्या सर्व व्हेरिएंटची किंमत कमी करण्यात आली आहे. जाणून घेऊयात Samsung Galaxy S23 FE ची नवी किंमत-

Also Read: Price Leak! लाँचपूर्वीच Vivo Y58 5G फोनची भारतीय किंमत लीक, तुमच्या बजेटमध्ये होणार का दाखल?

Samsung Galaxy S23 FE च्या किमतीत कपात

लाँच दरम्यान, Samsung Galaxy S23 फॅन एडिशन 8GB RAM सह लाँच केले गेले होते. फोनचे 128GB मॉडेल 59,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर, फोनचे 256GB स्टोरेज वेरिएंट 64,999 रुपयांना लाँच करण्यात आले आहे. आता Samsung ने दोन्ही मॉडेल तब्बल 23,000 रुपयांनी स्वस्त केले आहेत. या कपातीनंतर, दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत अनुक्रमे 36,999 आणि 41,999 रुपये इतकी झाली आहे. नव्या किमतीसाठी तुम्ही Samsung च्या अधिकृत साईटला भेट देऊ शकता किंवा येथे क्लिक करू शकता.

Samsung Galaxy S23 FE
Samsung Galaxy S23 FE

Samsung Galaxy S23 FE चे फीचर्स आणि स्पेक्स

Samsung Galaxy S23 FE मध्ये 6.4 इंच लांबीचा फुल HD + पंच-होल डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटवर काम करतो. हा स्मार्टफोन ॲल्युमिनियम फ्रेमवर बनवला गेला आहे. तसेच, फोनची स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 ने संरक्षित आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन Samsung Exynos 2200 ऑक्टाकोर प्रोसेसरसह सुसज्ज आहे. विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये आय केअर डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे, जो दीर्घकाळ फोन वापरतानाही डोळे सुरक्षित ठेवतो.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याच्या मागील पॅनलवर 50MP मेन सेन्सर दिला गेला आहे, जो 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 8MP टेलिफोटो लेन्ससह जोडलेला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 10MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यासह 25W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचे समर्थन आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo