Samsung ने आपल्या Galaxy S23 सिरीजमधील फॅन एडिशन मोबाईल 4 ऑक्टोबर रोजी भारतात सादर केला. त्यानंतर आता दिवाळीच्या निमित्ताने कंपनीने त्याचे स्पेशल एडिशन भारतीय बाजारात सादर केले आहे. हे मर्यादित स्टॉकसह दोन नवीन कलर ऑप्शन्समध्ये बाजारात आणले गेले आहे. चला तर मग जाणून घेऊयात या स्मार्टफोनच्या स्पेशल एडिशनची किंमत आणि इतर सर्व तपशील.
हे सुद्धा वाचा: उद्या Amazon Sale चा शेवटचा दिवस! ‘या’ Best बजेट 5G स्मार्टफोन्सवर मिळतील अप्रतिम ऑफर्स। Tech News
सॅमसंगने या स्पेशल एडिशन मोबाइलला त्याच्या अधिकृत वेबसाइटवर इंडिगो आणि टेंगेरिन सारख्या दोन नवीन कलर ऑप्शन्ससह भारतीय बाजारात सादर केले आहे. जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तो केवळ अधिकृत वेबसाइट Amazon आणि इतर आउटलेटवरून खरेदी करता येईल.
Samsung Galaxy S23 FE स्पेशल एडिशनच्या 8GB रॅम + 128GB वेरिएंटची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB रॅम + 256GB मॉडेलची किंमत 64,999 रुपये आहे.
स्पेशल एडिशनवरील उपलब्ध ऑफरबद्दल बोलायचे तर, Galaxy S23 FE स्पेशल एडिशनवर 10,000 रुपयांपर्यंतची बँक ऑफर आहे. ही ऑफर HDFC क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर उपलब्ध आहे. Galaxy S23 FE स्पेशल एडिशन खरेदी केल्यावर, तुम्ही Axis Bank क्रेडिट कार्डच्या मदतीने 10% कॅशबॅक देखील मिळवू शकता.
Samsung Galaxy S23 FE स्पेशल एडिशनमध्ये 6.4 इंच FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट आणि गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. नवीन स्पेशल एडिशन फोन पॉवरफुल Exynos 2200 चिपसेटवर चालतो. यासोबत Xclipse 920 GPU बसवण्यात आला आहे. त्याबरोबरच, डेटा स्टोअर करण्यासाठी यात 8GB रॅम मेमरीसह 128GB आणि 256GB स्टोरेजचे देखील सपोर्ट आहे.
कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. यात 50MP प्राइमरी, 8MP 3x ऑप्टिकल झूम लेन्स आणि बॅक पॅनलवर 12MP 123 डिग्री अल्ट्रावाइड लेन्स आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी डिव्हाइसच्या पंच होल नॉचमध्ये 10MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 25W चार्जिंग क्षमतेसह 5,000mAh बॅटरी आहे. जो चांगला बॅकअप देण्यास सक्षम आहे.