digit zero1 awards

प्रतीक्षा संपली! Samsung Galaxy S23 FE 5G भारतात लाँच, तब्बल 10,000 रुपयांपर्यंत Special Discountसह खरेदी करा 

प्रतीक्षा संपली! Samsung Galaxy S23 FE 5G भारतात लाँच, तब्बल 10,000 रुपयांपर्यंत Special Discountसह खरेदी करा 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S23 FE 5G आज अखेर भारतात लाँच

या स्मार्टफोनच्या खरेदीवर 10,000 रुपयांपर्यंतची बँक ऑफर उपलब्ध

स्मार्टफोन 5 ऑक्टोबरपासून Samsung ई-स्टोअर आणि Amazon वेबसाइटवर खरेदी करता येईल.

भारतात Samsung Galaxy S23 FE 5G ची प्रतीक्षा अखेर संपली आहे. साऊथ कोरियाच्या ब्रँडने हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या Galaxy S21 FE च्या अपग्रेड व्हर्जनच्या रूपात सादर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी कंपनीने Galaxy S22 चे FE व्हर्जन सादर केले नव्हते. तसेच, Galaxy S20 FE 5G प्रमाणे यावेळी देखील कंपनीने Exynos प्रोसेसरसह हा स्मार्टफोन सादर केला आहे. चला, जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि ऑफर्स-

Samsung Galaxy S23 FE 5G किंमत

samsung galaxy s23 fe

Samsung Galaxy S23 FE 5G हा स्मार्टफोन भारतात दोन स्टोरेज व्हेरिएंट 8GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB मध्ये सादर करण्यात आला आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये आहे. तर, फोनच्या टॉप व्हेरिएंट 64,999 रुपयांना येतो. विशेष म्हणेज या स्मार्टफोनच्या खरेदीवर 10,000 रुपयांपर्यंतची बँक ऑफर देखील उपलब्ध आहे. हे 5 ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून सॅमसंग ई-स्टोअर आणि Amazon वेबसाइटवर खरेदी करता येईल.

Samsung Galaxy S23 FE 5G

Galaxy S23 FE Launched details here
Galaxy S23 FE Launched details here

Samsung Galaxy S23 FE 5G या मिड-बजेट प्रीमियम स्मार्टफोनमध्ये 6.4 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. फोनचा डिस्प्ले हाय रिझोल्यूशनसह 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात पंच-होल डिझाइनसह डिस्प्ले आहे आणि फोनचा लूक Galaxy S23 सारखा आहे. सॅमसंगने या फोनमध्ये इन-हाउस ऑक्टाकोर प्रोसेसर Exynos 2200 प्रदान केला आहे.

Samsung Galaxy S23 FE 5G च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 50MP चा मेन कॅमेरा आहे, जो OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फिचरला सपोर्ट करतो. याशिवाय, फोनमध्ये 12MP अल्ट्रा वाईड आणि 8MP टेलिफोटो कॅमेरा आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10MP कॅमेरा सेन्सर आहे. हा फोन 4,500mAh बॅटरीसह येतो, ज्यामध्ये 25W USB टाइप C चार्जिंग फीचर उपलब्ध आहे.

इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा सॅमसंग स्मार्टफोन Android 13 वर आधारित OneUI ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनमध्ये ड्युअल 5G सिम कार्डचे समर्थन आहे. याशिवाय NFC, Bluetooth 5.3, Wi-Fi 6 सपोर्ट आहे. तसेच, यात UFS 3.3 स्टोरेज सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo