digit zero1 awards

लाँचआधीच आगामी Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोनची Price Leak! येथे बघा संपूर्ण Details

लाँचआधीच आगामी Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोनची Price Leak! येथे बघा संपूर्ण Details
HIGHLIGHTS

आगामी Samsung Galaxy S23 FE बद्दल आजकाल बरीच चर्चा सुरु आहे.

Samsung Galaxy S23 FE सोबत कंपनी Galaxy Buds FE देखील लाँच करू शकते.

हे दोन्ही डिवाइस 4 ऑक्टोबर रोजी लाँच केले जाऊ शकतात.

सॅमसंगच्या फॅन एडिशन मोबाईल म्हणजेच आगामी Samsung Galaxy S23 FE बद्दल आजकाल टेक विश्वात बरीच चर्चा सुरु आहे. अलीकडील लीक्सवरून असे समोर आले आहे की, हा डिवाइस 4 ऑक्टोबर रोजी लाँच केला जाऊ शकतो. कंपनी या स्मार्टफोनसोबत Galaxy Buds FE देखील लाँच करू शकते. दरम्यान, फोनची किंमत एका सोर्सकडून लाँचआधीच ऑनलाईन शेअर केली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊयात फोनची लीक किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Samsung Galaxy S23 FE ची लीक किंमत

विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार म्हणजेच लीकनुसार Samsung Galaxy S23 FE फॅन एडिशन मोबाइल यूएस मार्केटमध्ये $ 599 म्हणजेच जवळपास 49,800 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हे उपकरण ग्रेफाइट, मिंट, पर्पल, व्हाइट, इंडिगो आणि टेंगेरिन कलरमध्ये उपलब्ध होतील, अशी देखील माहिती मिळाली आहे.

samsung galaxy s23 fe
samsung galaxy s23 fe 5g

वर सांगितल्याप्रमाणे, Samsung Galaxy S23 FE सोबत कंपनी Galaxy Buds FE देखील लाँच करू शकते. याची किंमत आधीच सांगण्यात आली आहे. हे $99 मध्ये म्हणजेच सुमारे 8,300 रुपयांना ऑफर केले जाऊ शकतात.

Samsung Galaxy S23 FE

लीकनुसार, एक 6.4 इंच लांबीचा डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळेल. हा फोन ग्लोबल टेक प्लॅटफॉर्मवर Exynos 2200 चिपसेटसह येऊ शकतो. Samsung Galaxy S23 FE मध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh बॅटरी दिली जाऊ शकते. स्मार्टफोनला गोरिल्ला ग्लास संरक्षण, पाणी आणि धूळ संरक्षणासाठी IP68 रेटिंग दिले जाऊ शकते.

कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy S23 FE मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात f/1.8 अपर्चर आणि OIS सह 50MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 3x झूम सुविधेसह 8MP टेलिफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10MP सेल्फी कॅमेरा मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo