भारीच की! Popular Samsung Galaxy S23 आणि S23+ फोन झाले कायमचे स्वस्त, किंमत तब्बल 10,000 रुपयांनी कमी। Tech News
Samsung Unpacked 2024 इव्हेंट येत्या 17 जानेवारी रोजी आयोजित केला जाणार आहे.
नवीन स्मार्टफोन येण्याआधी कंपनीने विद्यमान सीरीजचे 2 फोन स्वस्त झाले आहेत.
लोकप्रिय सिरीजच्या Samsung Galaxy S23 आणि S23+ च्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे.
Samsung Unpacked 2024 इव्हेंट दरम्यान कंपनी आपली नवीन फ्लॅगशिप Samsung Galaxy S24 सीरीज लाँच करेल. कंपनी नवीन सीरीज अंतर्गत Galaxy S24, Galaxy S24+ आणि Galaxy S24 Ultra लाँच करू शकते. हा इव्हेंट येत्या 17 जानेवारी रोजी आयोजित केला जाणार आहे. नवीन स्मार्टफोन येण्याआधी कंपनीने विद्यमान सीरीजचे 2 फोन स्वस्त केले आहेत. हे दोन फोन Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23+ आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने दोन्ही फोनची किंमत 10,000 रुपयांनी कमी केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात लोकप्रिय Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23+ ची नवी किंमत-
हे सुद्धा वाचा: Good News! iQOO Neo 7 5G ची किमतीत तब्बल 4000 रुपयांची घट, आता आणखी Affordable दरात खरेदी करा महागडा स्मार्टफोन
Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23+ ची नवी किंमत
Samsung Galaxy S24 सिरीज येण्यापूर्वी कंपनीने Galaxy S23 आणि Galaxy S23+ च्या किमतीत 10,000 रुपयांची कपात केली आहे. यापूर्वी Samsung Galaxy S23 5G च्या 128GB मॉडेलची किंमत 74,999 रुपये होती. तर, 256GB मॉडेल 79,999 रुपयांना उपलब्ध होते. मात्र, कपातीनंतर हे मॉडेल्स अनुक्रमे 64,999 आणि 69,999 रुपयांना खरेदी करता येतील.
त्याचप्रमाणे, Samsung Galaxy S23+ फोनच्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 94,999 रुपये आणि 512GB मॉडेलची किंमत 1,04,999 रुपये होती. मात्र, 10,000 रुपयांच्या कपातीनंतर हे स्मार्टफोन्स 84,999 आणि 94,999 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. दोन्ही स्मार्टफोनची नवीन किंमत प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर लाइव्ह झाली आहे.
Samsung Galaxy S23 आणि S23+ चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले
Samsung Galaxy S23 फोनमध्ये 6.1-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, तर प्लस मॉडेलमध्ये 6.6-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.
प्रोसेसर
Samsung Galaxy S23 आणि S23+ स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहेत. हाय व्हिज्युअल कॉलिटी, साउंड कॉलिटी इ. बरेच लाभ तुम्हाला या प्रोसेसरसह मिळतील.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. यात 10MP दुय्यम आणि 12MP तिसरा कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी
Samsung Galaxy S23 फोनध्येय 3900mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर, Samsung Galaxy S23+ मॉडेलमध्ये 4700mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile