तुम्ही नुकत्याच झालेल्या Amazon रिपब्लिक डे सेल ऑफर्सचा लाभ घेतला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर बरेच प्रोडक्ट्स अजूनही उत्तम ऑफर्ससह उपलब्ध आहेत. सध्या, सॅमसंगचा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्यावर मोठी सवलत आहे. तुम्ही Amazon वरून Samsung Galaxy S22 Ultra फक्त 73,580 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 1,31,999 रुपये आहे, परंतु हा फोन स्वस्तात खरेदी कसा करायचा ते बघुयात…
हे सुद्धा वाचा : 1GB दैनिक डेटासह Airtel प्रीपेड प्लॅन्स, किंमत 181 रुपयांपासून सुरू
दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी Samsung Galaxy S23 सीरीज रिलीज करण्याची योजना आखत आहे. कदाचित त्यामुळेच कंपनी Galaxy S22 Ultra ची स्वस्त दरात विक्री करत आहे. Samsung Galaxy S22 Ultra च्या 12GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेज वेरिएंटची किरकोळ किंमत 1,31,999 रुपये आहे. सॅमसंगचा महागडा स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 30 टक्के डिस्काउंटवर विकला जात आहे. वापरकर्ते Samsung Galaxy S22 Ultra 92,880 रुपयांना खरेदी करू शकतात.
त्याची किंमत आणखी कमी करण्यासाठी, वापरकर्ते बँक ऑफरची मदत घेऊ शकतात. बँक ऑफर व्यतिरिक्त, वापरकर्ते निवडक कार्ड ऑफर आणि एक्सचेंज डीलसह प्रीमियम फोनची किंमत आणखी कमी करू शकतात. कोटक महिंद्रा बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर, वापरकर्त्यांना 10 % अंतर्गत 1,250 पर्यंत सूट मिळेल. यासोबत स्मार्टफोनची किंमत 91,630 रुपये होईल. हा फोन आणखी स्वस्त दरात खरेदी करण्यासाठी तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता.
वापरकर्ते जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून Samsung Galaxy S22 Ultra देखील खरेदी करू शकतात. वापरकर्ते Amazon वर रु. 18,050 पर्यंत एक्सचेंज ऑफर घेऊ शकतात. पण, जुन्या स्मार्टफोनची एक्सचेंज व्हॅल्यू फोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल. तुम्हाला एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरचा पुरेपूर लाभ मिळाला तर एकूण बचत 58,419 रुपये होईल.