Samsung Galaxy S23 सिरीज 1 फेब्रुवारी रोजी लाँच झाली आहे. नवीन सीरिज लाँच झाल्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी S22 च्या किमती सतत कमी होत आहेत. कंपनीने पुन्हा एकदा सॅमसंगच्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. यापूर्वी, कंपनीने फोनच्या किमती दोनदा कमी केल्या आहेत. Samsung Galaxy S23 सीरीज लॉन्च झाल्यानंतर, जिथे कंपनी S22 ची किंमत कमी करत आहेच, तर दुसरीकडे Samsung Galaxy S22+ मॉडेल कंपनीच्या साइटवरूनच काढून टाकण्यात आले आहे. ते यापुढे खरेदीसाठी उपलब्ध नाही.
हे सुद्धा वाचा : Flipkart बिग बचत धमाल सेल, स्मार्ट TV खरेदी करण्याची उत्तम संधी
नोव्हेंबर महिन्यात कंपनीने Samsung Galaxy S22 ची किंमत 10,000 रुपयांनी कमी केली होती. पहिल्या फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 72,999 रुपये होती. कपातीनंतर हे मॉडेल 62,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. त्याचा दुसरा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटसह येतो, ज्याची किंमत पूर्वी 76,999 रुपये होती. तर, कपात केल्यानंतर ते 66,999 रुपये झाले होते.
त्यानंतर, पुन्हा एकदा कंपनीने हा फोन 5000 रुपयांनी स्वस्त केला आहे. आता फोनचे 128GB मॉडेल 62,999 रुपयांऐवजी 57,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. 256GB वेरिएंटची किंमत 66,999 रुपयांऐवजी 61,999 रुपये करण्यात आली आहे.
तसेच , या वेळीही कंपनीने फोनची किंमत 5,000 रुपयांनी कमी केली आहे. आता फोनचे 128GB मॉडेल 57,999 रुपयांऐवजी 52,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. 256GB व्हेरिएंटची किंमत 61,999 रुपयांऐवजी 56,999 रुपये करण्यात आली आहे. लाँच किमतीच्या तुलनेत आता तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी S22 फोन 20,000 रुपये स्वस्तात खरेदी करू शकता.