सर्वात पावरफुल स्मार्टफोन सीरीज Samsung Galaxy S23 नवीन वर्षात लाँच होणार
त्याबरोबरच, कंपनी परवडणारा स्मार्टफोन Samsung Galaxy S22 FE लाँच करण्याच्या तयारीत आहे.
Samsung Galaxy S22 FEमध्ये 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा असेल.
सॅमसंग नवीन वर्षात आपली सर्वात पावरफुल स्मार्टफोन सीरीज Samsung Galaxy S23 लॉन्च करणार आहे. या सिरीजसोबतच कंपनी आणखी एक परवडणारा स्मार्टफोन Samsung Galaxy S22 FE लाँच करण्याच्या तयारीत आहे. नव्या लीकनुसार, फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती समोर आली आहे. लीकनुसार, हा फोन 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सरने सुसज्ज असेल. हा फोन जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होऊ शकतो.
लीक्सनुसार, फोनला 4nm Exynos 2300 चिपसेटचा सपोर्ट मिळेल. हा फोन 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा असेल. मागील फोनसोबत 12-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे. म्हणजेच कंपनी Samsung Galaxy S22 FE च्या कॅमेऱ्यात मोठा बदल करणार आहे.
Samsung Galaxy S23 Ultra
स्मार्टफोन ब्रँड Samsung लवकरच आपली फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Samsung Galaxy S23 लॉन्च करणार आहे. या सीरीज अंतर्गत, Samsung Galaxy S23 Ultra हा टॉप व्हेरिएंट म्हणून सादर केला जाईल. या फोनच्या स्पेसिफिकेशनचीही माहिती समोर आली आहे. लीक्सनुसार, हा फोन 200 मेगापिक्सेल कॅमेरासह ISOCELL HP2 सेन्सरने सुसज्ज असू शकतो.
यासोबतच, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर 5,000mAh बॅटरीसह दिला जाऊ शकतो. फोनच्या इतर कॅमेरा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 10 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स आणि 10x ऑप्टिकल झूमचा सपोर्ट मिळू शकतो. फोनमध्ये 60fps वर 8K व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची सुविधाही उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.