जर तुम्ही मिड-रेंज स्मार्टफोनवरून प्रीमियम स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की Samsung Galaxy S22 हा एक उत्तम पर्याय आहे. Samsung ने अलीकडेच आपला नवीनतम Samsung Galaxy S23 लाँच केला आहे. त्यानंतर दुसरीकडे, एक वर्ष जुना झालेला Samsung Galaxy S22 तुम्हला कमी किमतीत आणि विशेष ऑफर्ससह खरेदी करता येईल. विशेषत: आता Amazon या फोन मोठ्या सवलती देत आहे.
हे सुद्धा वाचा : Facebook अकाउंट डिलीट करायचे आहे ? येथे जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग
Samsung Galaxy S23 लाँच केल्यानंतर कंपनीने Galaxy S22 वर मोठ्या प्रमाणात सूट जाहीर केली आहे. एंट्री-लेव्हल Samsung Galaxy S22 चा 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 57,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. मात्र, स्मार्टफोनची वास्तविक किंमत रु. 85,999 आहे. म्हणजेच Amazon त्यावर 33% सवलत देत आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी क्लिक करा…
तुम्ही Samsung Galaxy S22 वर उपलब्ध एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर देखील घेऊ शकता. तुम्हाला Amex क्रेडिट कार्ड्स आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक क्रेडिट कार्ड्सवर रु. 1500 पर्यंत 7.5% झटपट सूट मिळू शकते. याशिवाय, नो-कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहे.
या व्यतिरिक्त, जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्हाला त्यावर 12,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. लक्षात ठेवा की, सवलत रक्कम तुमच्या जुन्या स्मार्टफोनचे मॉडेल, त्याची स्थिती आणि तुमच्या क्षेत्रातील एक्सचेंजची उपलब्धता यावर अवलंबून असेल. सर्व ऑफर्सनंतर, Samsung Galaxy S22 ची किंमत 44,499 रुपयांपर्यंत कमी केली जाऊ शकते. किंमत जवळपास बदलत राहण्याची शक्यता असते.