Samsung Galaxy S22 5G स्मार्टफोन AMAZONवर भारी सवलतीत उपलब्ध
ऍमेझॉनवर Prime Phones Party सुरू आहे, जो 8 जानेवारीपर्यंत चालणार आहे.
Samsung Galaxy S22 5G च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 85,999 रुपये आहे.
स्मार्टफोन ही आजच्या काळात प्रत्येकाची मूलभूत गरज बनली आहे. यामुळेच प्रत्येक बजेटमध्ये प्रत्येकाच्या गरजेनुसार स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला Samsung Galaxy S22 5G वर मिळणाऱ्या प्रचंड सवलतीबद्दल सांगणार आहोत. हा एक प्रीमियम स्मार्टफोन असला तरी, तुम्ही अत्यंत स्वस्त किंमतीत हा फिन खरेदी करू शकता. ही सवलत ऑफर Amazon वर उपलब्ध आहे.
ऍमेझॉनवर Prime Phones Party सुरू आहे, जो 8 जानेवारीपर्यंत चालणार आहे. सेलमध्ये तुम्ही सॅमसंगचा हा फ्लॅगशिप फोन खास किंमतीत खरेदी करू शकता. ई-कॉमर्स वेबसाइटवरील सर्व ऑफरनंतर तुम्ही तो 45,799 मध्ये तुमचा बनवू शकता.
Samsung Galaxy S22 5G वर Amazon ऑफर
Samsung Galaxy S22 5G च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 85,999 रुपये आहे. पण Amazon च्या 29 टक्के डिस्काउंटनंतर ती फक्त 60,999 रु. वर आली आहे. याशिवाय, एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर देखील वेबसाइटवर सूचीबद्ध आहेत.
एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 15,200 रुपयांची सूट मिळू शकते. अशाप्रकारे Samsung Galaxy S22 5G ची किंमत 45,799 रुपये असेल. ग्राहकांना हवे असल्यास ते नो कॉस्ट EMI वरही फोन खरेदी करू शकतात.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.