Samsung Galaxy S20 FE Deal: निम्म्याहून कमी किमतीत खरेदी करा जबरदस्त स्मार्टफोन, लिमिटेड टाइम ऑफर

Samsung Galaxy S20 FE Deal: निम्म्याहून कमी किमतीत खरेदी करा जबरदस्त स्मार्टफोन, लिमिटेड टाइम ऑफर
HIGHLIGHTS

Amazon वर Samsung Galaxy S20 FE वर भरघोस सवलत मिळत आहे.

डिस्काउंटसह हा फोन 34,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे.

HDFC बँक कार्ड EMI व्यवहारांवर 4000 रुपयांपर्यंत झटपट सूट

साऊथ कोरियाची प्रसिद्ध कंपनी Samsungचे प्रोडक्ट्स भारतात लोकप्रिय आहेत. सॅमसंगच्या स्मार्टफोन्सना तर भारतात बरीच मागणी आहे. आज आम्ही तुम्हाला अप्रतिम डील सांगणार आहोत. Amazon वर Samsung Galaxy S20 FE वर भरघोस सवलत मिळत आहे. या सवलतीसह स्मार्टफोनची किंमत निम्म्याहून कमी झाली आहे. 

Samsung Galaxy S20 FE ची किंमत

Samsung Galaxy S20 FE वर Amazon 53% ची प्रास्ताविक सूट देत आहे. स्मार्टफोनची मूळ किंमत 74,999 रुपये आहे. मात्र डिस्काउंटसह हा फोन 34,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. यासह, Amazon एक्सचेंज डील आणि काही बँक ऑफर देखील दिले जात आहेत, ज्यामुळे Galaxy S20 FE ची किंमत आणखी कमी होईल. येथून खरेदी करा

 बँक ऑफर्स 

तुम्हाला Amazon वर काही बँक ऑफर्स देखील मिळत आहेत. HDFC बँक कार्ड EMI व्यवहारांवर 4000 रुपयांपर्यंत झटपट सूट मिळत आहे. HSBC क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर 2000 रुपयांपर्यंत म्हणजेच 7.5% झटपट सूट देखील मिळेल. त्याबरोबरच, येस बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 1500 रुपयांपर्यंत झटपट सूट आहे. तर, HSBC कॅशबॅक कार्ड क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 250 रुपयांपर्यंत सूट मिळेल.

Galaxy S20 FE वर Amazon प्रचंड एक्सचेंज डील देत आहे, जिथे तुम्ही 32,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. मात्र, लक्षात घ्या की एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनच्या स्थितीवर अवलंबबुन असणार आहे. 

Samsung Galaxy S20 FE 

Samsung Galaxy S20 5G मध्ये 6.5-इंच फुल-HD+ सुपर AMOLED इन्फिनिटी-O डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह आहे. डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 द्वारे संरक्षित आहे. Samsung Galaxy S20 FE 5G फोन Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसरने सुसज्ज आहे. Qualcomm Snapdragon 865 हे फ्रीफायर, PUBG MOBILE सारखे गेम हाताळण्यासाठी पुरेसे जलद आहे. ज्यामध्ये 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज उपलब्ध आहे. Samsung Galaxy S20 FE IP68 रेटिंगसह सादर करण्यात आला आहे.

Samsung Galaxy S20 FE 5G फोनमध्ये 4G व्हेरिएंट सारखाच कॅमेरा सेटअप आहे. म्हणजेच, हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह देखील येतो, ज्यामध्ये 12-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आहे, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि ड्युअल फेज डिटेक्शन ऑटोफोकसने सुसज्ज आहे. याशिवाय, तुम्हाला या सेटअपमध्ये 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-एंगल शूटर देखील मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, Galaxy S20 FE च्या समोर 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे. फ्रंट कॅमेऱ्यासहा तुम्हाला ऑटोफोकस सपोर्ट मिळणार आहे. 

या फोनमध्ये 4,500mAh बॅटरी उपलब्ध आहे, ज्यासह वायरलेस चार्जिंग 2.0 सपोर्ट उपलब्ध आहे. तसेच, यात 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. हा एक चांगला चार्जर आहे जो, सामान्य 15W चार्जरपेक्षा तुमचा फोन जलद चार्ज करतो. फोनचा 4G व्हेरिएंट 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo